अप्पर पाेलिस अधिक्षक, पाेलिस अधिक्षक कार्यालयासाठी 26.14 काेटीचा निधी आमदार राहुल आवाडे यांचा पाठपुरावा: वाढत्या गुन्हेगारीला लागणार चाप

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी
दि.२९: शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी इचलकरंजी येथे अप्परपाेलिस अधीक्षक आणि पाेलिस उपअधीक्षक यांचे कार्यालय एकाच छताखाली व एकाच ठिकाणी आणण्यासाठी आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यांच्या प्रयत्नातून दाेन महत्वांच्या कार्यालयासाठी शासनाकडून 26 काेटी 14 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.  या निर्णयामुळे शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम हाेण्यास व गुन्हेगारीला आळा घालण्यास माेठी मदत हाेणार असून पाेलिस प्रशासनाला आवश्यक त्या सुविधाही उपलब्ध हाेणार आहेत.
इचलकरंजी शहर व परिसरात औद्याेगिकीकरणासाेबतच लाेकसंख्या वाढत चालली असून शहराचा विस्तार झपाट्याने हाेत आहे. याशिवाय गुन्हेगारीच्या प्रमाणातही सातत्याने वाढ हाेत आहे. त्याला आळा घालण्यासह कायदा व सुव्यवस्था आणि औद्याेगिक शांतता अबाधित राहण्यासाठी पाेलिस यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने अप्पर पाेलिस अधिक्षक व पाेलिस उपअधिक्षक ही कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी आमदार आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरु केला हाेता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून गावभाग पाेलिस ठाण्यालगतच अप्पर पाेलिस अधिक्षक, पाेलिस उपअधिक्षक यांचे स्वतंत्र कार्यालय उभारण्यात येणार आहेत. त्याचबराेबर 40 राखीव पाेलिस दलाच्या जवानांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने 26 काेटी 14 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
एकाच ठिकाणी हाेणाèया या नवीन कार्यालयांमुळे पाेलिस अधिकारी व कर्मचाèयांना कार्यक्षम वातावरण मिळेल. त्याचबराेबर शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासह नागरिकांच्या सुरक्षेसाठी पाेलिस यंत्रणा अधिक बळकट हाेईल, असा विश्वास आमदार राहुल आवाडे यांनी व्यक्त केला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.