महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्सच्या गव्हर्निंग काैन्सिलवर आमदार राहुल आवाडे यांची पुनर्निवड

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी 
 दि. ५ :  महाराष्ट्रातील व्यापार, उद्याेग, कृषी व सेवा क्षेत्रातील अग्रगण्य शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चरच्या गव्हर्निंग काैन्सिल सदस्यपदी आमदार राहुल प्रकाश आवाडे यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे.  संस्थेची नुकतीच निवडणूक बिनविराेध पार पडली. त्यानंतर झालेल्या नुतन संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदी रवींद्र माणगांवे तर उपाध्यक्षपदी संजय शेटे यांची बिनविराेध निवड करण्यात आली. याच बैठकीत गव्हर्निंग काैन्सिल सदस्यपदी आमदार राहुल आवाडे यांच्या निवडीची घाेषणा करण्यात आली.
राजकारण, समाजकारण, उद्याेग व सहकार क्षेत्रात सक्रिय असलेल्या आमदार आवाडे यांनी विविध जबाबदाèया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा प्रवास विकासाभिमुख राहिला असून विविध याेजनांच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघाच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या केन कमिटीचे चेअरमन म्हणूनही त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली आहे. ऊस उत्पादक शेतकèयांच्या हितासाठी तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले असून ड्राेनद्वारे औषध फवारणीसारखे नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण याेगदान राहिले आहे.
महाराष्ट्र चेंबरच्या गव्हर्निंग काैन्सिल सदस्य म्हणून काम करताना त्यांनी उद्याेग, व्यापार, कृषी व सेवा क्षेत्राच्या विकासासाठी विविध विधायक सूचना आणि याेजनांची मांडणी केली हाेती. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची पुन्हा एकदा या महत्त्वाच्या पदावर निवड करण्यात आली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.