बिल्डर्स असाेसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरच्या चेअरमनपदी शितल काजवे

इचलकरंजी –विजय मकोटे 
दि.६: देशभरातील बिल्डर्स, काॅन्ट्रॅक्टर, सप्लायर्स, इंजिनिअर्स यांची शिखर संस्था असलेल्या बिल्डर्स असाेसिएशन ऑफ इंडियाच्या इचलकरंजी सेंटर चेअरमनपदी शितल काजवे, व्हाईस चेअरमनपदी राजेंद्र शिंत्रे, सेक्रेटरीपदी पुंडलिक जाधव, जाॅ. सेक्रेटरीपदी दिलीप पटेल आणि ट्रेझररपदी श्रीकांत लास्कर यांची निवड करण्यात आली आहे.


इचलकरंजी सेंटरचे मावळते चेअरमन फैयाज  गैबान यांच्या अध्यक्षतेखाली असाेसिएशनची बैठक पार पडली. त्यामध्ये सन २०२६-२०२८ या सालासाठी नवनिर्वाचित पदाधिकाèयांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. बिल्डर्स असाेसिएशन ऑफ इंडिया ही देशपातळीवर कार्यरत संस्था असून देशभरातील बांधकाम क्षेत्रातील काॅन्ट्रॅक्टर, गव्हमेंट काॅन्ट्रॅक्टर, सप्लायर्स, बिल्डर्स, आरएमसी, फॅब्रिकेटर्स, सॅनिटर वेअर आदींची शिखर संस्था म्हणून काम करते. या असाेसिएशनच्या इचलकरंजी सेंटरच्या पदाधिकाèयांची बैठक झाली. बैठकीत सन 2026 ते 2028 सालासाठीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
नुतन कार्यकारिणीमध्ये फैयाज गैबान, प्रताप साळुंखे, माेहन सातपुते, संजय रुगे, तानाजी हराळे, भगवान कांबुरे, पन्नालाल डाळ्या, शिवाजी पाेवार, विकास चंगेडीया, सुहास अकिवाटे, महांतेश काेकळकी, प्रल्हाद माने, स्वप्निल शहा, शिवकुमार हिराणी, मयुर शहा, श्रीकांत रुगे, संजय घायतिडक, रमेश मर्दा, नितीन धुत, राजेंद्र खंडेराजुरे, महेश महाजन, सुधीर लाटकर यांचा समावेश आहे. निवडीनंतर नुतन पदाधिकाèयांचा सेंटरचे माजी चेअरमन ैयाज गैबान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.