कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या जिल्हाध्यक्षपदी नितीन धूत यांची निवड

इचलकरंजी: विजय मकोटे 
दि.१३: कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या जिल्हाध्यक्षपदी उद्योजक नितीन धूत यांची निवड करण्यात आली आहे. येथील महेश सेवा समिती सभागृहात पार पडलेल्या निवडणुकीत ही निवड जाहीर करण्यात आली.कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असून समाजाला एकसंघ ठेवण्याचे कार्य सातत्याने करत आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरचे ट्रस्ट चेअरमन, क्रेडाई इचलकरंजीचे संस्थापक अध्यक्ष, वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळणारे उद्योजक नितीन धूत यांनी कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा तीन वर्षे समर्थपणे पार पाडली. त्याचबरोबर समाजकार्यात सतत सक्रिय सहभाग घेत असतात. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांची कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.


नवीन कार्यकारिणीत वरिष्ठ उपाध्यक्षपदी सुरेशचंद्र दरगड, उपाध्यक्षपदी रामनारायण गट्टाणी (इचलकरंजी), मनीष झंवर (करवीर), दिपक बियाणी (जयसिंगपूर), कोषाध्यक्ष पदी अशोककुमार मंत्री, संघटन मंत्री पदी बजरंगलाल काबरा, सहसचिवपदी शिवप्रसाद तापडीया व सुरेंद्रकुमार हेडा यांची निवड करण्यात आली.
कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे सर्वच स्तरांतून अभिनंदन होत आहे.
निवडणुक अधिकारी ची जबाबदारी C.A घनश्याम सोनी यानी पार पाडली।

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.