केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंध

 कोल्हापूर: प्रतिनिधी 

दि. १६ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या १९  व २० जून रोजी होणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये विमानतळ परिसर तसेच संपूर्ण कोल्हापूर व इचलकरंजी शहरात दिनांक १९  व २०  जून या कालावधीत ड्रोन कॅमेरे उडविणे आणि चित्रीकरण करण्यास प्रतिबंध करण्यात आली असल्याची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविली आहे. 

           केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यावेळी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्या दरम्यान ते कोल्हापूर विमानतळ, पोलीस परेड ग्राउंड व फुटबॉल मैदान, कसबा बावडा, महालक्ष्मी मंदिर, शासकीय विश्रामगृह, जनता सहकारी बँक, इचलकरंजी, कलाप्पा आवाडे टेक्सटाईल पार्क (KATP), इचलकरंजी येथे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळ परिसरासह संपूर्ण कोल्हापूर व इचलकरंजी शहरात १९  व २०  जून २०२६ या कालावधीत ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास बंदी राहणार आहे.

        या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३  नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.