उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि.१९: पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्यांतर्गत श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर परिसरातील विकास कामाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे उद्या आगमन होणार आहे. त्यांच्या उद्याच्या दौऱ्यात सहभागी होण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रात्री उशिरा ११ वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत उद्या सकाळी ११ वाजता श्री. महालक्ष्मी अंबाबाई मंदिर परिसरात विविध विकासकामांचा शुभारंभ होणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रिमंडळातील अन्य सदस्य यासाठी उपस्थित राहणार आहेत.मंदिरातील विकास कामाच्या शुभारंभा नंतर मंदिर पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्यांतर्गत श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर परिसरातील परिसराची पाहणी करून दुपारी ११. ३० च्या सुमारास पोलीस परेड ग्राउंडवरील जाहीर सभेला गृहमंत्री संबोधित करणार आहेत.
त्यानंतर दुपारच्या सत्रात ४ वाजताच्या सुमारास इचलकरंजी येथील जनता सहकारी बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन तसेच शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नामविस्तार सोहळ्यात ते सहभागी होणार आहे. त्यानंतर दुपारी ४.४५ वाजताच्या सुमारास कल्लाप्पांना आवाडे टेक्सस्टाईल पार्क मैदान इचलकरंजी इथे शेतकऱ्यांच्या मेळाव्याला ते संबोधित करणार आहे.या दोन्ही कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहे.
रात्री अकरा वाजताच्या सुमारास विमानतळावर त्यांच्या आगमन झाल्यानंतर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खा. धैर्यशील माने, कोल्हापूर महानगरपालिका महापौर रुपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.