शरद इन्स्टिट्युटच्या 16 विद्यार्थ्यांची वोडाफोन आयडिया कंपनीत निवड
यड्राव : विजय धगेकर
दि 24 नोव्हेंबर :यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या 16 विद्यार्थ्यांची वोडाफोन आयडिया या नामांकित कंपनीत निवड झाली.
इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलेकम्युनिकेशन विभागातील आदर्शा पाटील, ऐश्वर्या कोळी, आलिया हेरवाडे, सुनिता भुसरे, गंधाली यादव, काजल धुमाळ, काजल शहा, किरण माळी, मिनल गुरव, निलोफर इनामदार, प्रतिक्षा मगदूम, शितल माने, श्रावणी सुतार, सोनाली जांभळे, तेजश्री पाटील, विद्या खोत यांची निवड झाली आहे.
वोडाफोन आयडिया हि कंपनी टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील अग्रेसर कंपनी आहे. कंपनी बँकिंग, इन्शुरन्स व फायनान्स असा विविध सेक्टरसाठी काम करते. त्यांचे टेक्निकल प्रॉबलेम्स साल्व करणेसाठी तसेच 4जी व 5जी या प्रोजेक्टवर विद्यार्थ्यांची टेक्निकल इंजिनिअर म्हणून निवड झाली आहे. विद्यार्थ्यांची अॅप्टीट्युड स्क्रिनिंग टेस्ट, दोन टेक्ऩिकल इंटरव्ह्यु व एक एच.आर. इंटरव्ह्यु झाला.
महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट बेस्ड लर्निग अंतर्गत सुरू असलेल्या अॅक्टीव्हिटी स्लॉटमध्ये मुलांच्याकडून ग्रुप डिसक्शन, इंटरव्ह्यु टेक्ऩिक्सचा सराव करून घेण्यात आला आहे. महाविद्यालयातील पी.सी.बी अॅण्ड वायरलेस सेन्सर नेटवर्क या इनोव्हेशन लॅबमध्ये केलेल्या सरावाचा फायदा विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी झाला.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन नामदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट सेलचे प्रा. नेहा सोनी, प्रा. अभिजित केकरे यांच्यासह सर्व डिन, विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.