देश, समाजासाठी याेगदान देण्यात ब्राम्हण समाज आघाडीवर : चंद्रचूड गाेंगले

इचलकरंजी:अजाज मुजावर
दि.७ ;ब्रह्म जाणताे ताे ब्राह्मण. ब्राह्मणत्त्वाची व्याख्या व्यापक, सर्वव्यापी आहे. त्यागाची वेळ जेव्हा येते तेव्हा सर्वात पुढे असणारा ब्राम्हण समाज बुद्धिमत्ता, गुणवत्ता यांच्या बळावर सर्व क्षेत्रात आघाड्यांवर दिसून येताे. सरकारकडून काहीही न मागता मी देशासाठी व इतरांसाठी काय देऊ शकताे असा व्यापक विचार समाजाने अनेकदा कृतीतून दाखवून दिला आहे, असे मत निवृत्त जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पाहुणे चंद्रचूड गाेंगले यांनी व्यक्त केले.
इचलकरंजी ब्राह्मण समाजाच्या वतीने आयाेजित लाेकमान्य टिळक पुरस्कार वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बाेलत हाेते. प्रारंभी श्री परशुराम, लाेकमान्य टिळक, श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घाेरपडे सरकार यांच्या प्रतिमेचे मान्यवरांचा हस्ते पूजन करण्यात आले. यंदाचा प्रतिष्ठेचा ‘लाेकमान्य टिळक पुरस्कार’ गाेपाळ तथा उल्हास चिंतामण लेले यांना प्रदान करण्यात आला. तसेच संताेष अविनाश साधले, स्नेहल विनय दंडगे, डाॅ. श्रीकृष्ण श्रीपाद काळे, श्रीकृष्ण नारायण गाेरे यांना ‘श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घाेरपडे सरकार पुरस्कार’, अध्यात्मिक क्षेत्रातील ‘वेदाेनारायण पुरस्कार’ वेदमूर्ती विश्वजित विजय मणेरीकर यांना आणि ‘सेवाभावी संस्था पुरस्कार’ मैत्री ाैंडेशन इचलकरंजी यांना प्रदान करण्यात आला. प्रमुख अतिथी किर्लाेस्कर ब्रदरचे निर्यात विभागातील उपाध्यक्ष प्रसाद माधवराव कुलकर्णी यांनी, तेजस्वी राष्ट्रभक्ती, ज्ञान, शाैर्य प्रखर मातृभक्ती आदी गुणांच्या बळावर ब्राह्मण समाज अनेक वर्षांपासून भारतभूमीच्या उत्कर्षासाठी अविरत याेगदान देत आला आहे, यापुढेही देत राहील, असा सांगितले.
यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी परशुराम मंदिरासाठी सर्वताेपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. वे.शा.संपन्न भाटवडेकर गुरुजी, दिग्विजय कुलकर्णी यांच्या अधिपत्याखाली  वेदमंत्राेच्चाराने ब्रह्मवृंन्दांच्या ईशस्तवनाने कार्यारंभ करणेत आला.
स्वागत ब्राह्मण सभा अध्यक्ष सुरेश जाेशी व विश्वस्त शैलेश गाेरे यांनी तर प्रास्ताविक उपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय विश्वस्त दिगंबर कुलकर्णी, डाॅ. पद्मनाभ कुलकर्णी, साै.रुपाली दिवाण यांनी केले. तर पाहुण्यांचे स्वागत सचीव संजय मैंदर्गी, किरण दंडगे, सतीश पळसुले, सतीश फडके, प्रा. मिलिंद दांडेकर साै. माधवी कुलकर्णी, महिला अध्यक्षा साै.अर्चना उत्तुरकर यांचे हस्ते करणेत आले. मानपत्र लेखन-वाचन मनिष आपटे यांनी केले. सूत्रसंचालन महेश फडके, साै. स्नेहल कुलकर्णी, साेशल मिडियावर, कार्यक्रमाचे प्रक्षेपण श्रीनिवास गाेडसे यांनी केले. आभार साै. अश्विनी कुलकर्णी यांनी तर सामुदायिक पसायदान साै. भाग्यश्री कुलकर्णी यांनी सादर केले. कार्यक्रमास महिला उपाध्यक्षा साै. वैभवी कुलकर्णी, साै. मेदिनी कुलकर्णी,साै संध्या कुलकर्णी ,साै संपदा ओगले, साै सुप्रिया भट तसेच जिजीबाई शिशुसंस्कार शिक्षिका-कर्मचारी वर्ग,सर्व ज्ञाती- बंन्धु भगिनींसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थीत हाेते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.