भटक्या विमुक्त जाती गटातून मुकूंद पोवार यांचा अर्ज दाखल
इचलकरंजी/ विजय मकोटे
दि ४ डिंसेंंबर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणूकीसाठी भटक्या विमुक्त जाती गटातून महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे संचालक मुकुंद पोवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
कोल्हापूर जिल्हा सहकारी मजूर संस्था संघाचे माजी चेअरमन असलेल्या मुकूंद पोवार यांनी मजूर संघाच्या माध्यमातून कामाचे जाळे विणले आहे. जिल्हा बँकेत मजुर संस्था, हौसिंग संस्था व इतर संस्था सभासद मोठ्या प्रमाणात आहेत. या सर्वांशी पोवार यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याने सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अर्ज दाखल करताना पोवार यांच्यासोबत प्रमोद पोवार, शरद करबे, बाळासाहेब पाटील, सतीश साळोखे, संजय मोहिते, महादेव पाटील, तुकाराम पाटील, रामजी पोवार, भीमा कांबळे, अरुण हेरवडे, शिरीष करंबे, अरुण निंबाळकर, मारुती कोरवी, रमेश पाटील, आनंदा पोवार, उत्तम पोवार, बाबासाहेब पोवार, विठ्ठल पाटील, संजय मांगले यांच्यासह ठरावधारक सभासद उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.