भाजपा शहर कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणं दिनानिमित्त अभिवादन

इचलकरंजी : विजय मकोटे

 

  दि6 डिसेंबर :भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर कार्यालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणं दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन इचलकरंजी नगरीचे उपनगराध्यक्ष तानाजी पोवार व पुष्पहार अर्पण प्रदिप माळगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरचिटणीस अमर कांबळे, अरविंद शर्मा, अरुण कुंभार उपस्थित होते.

              या वेळी भाजपा शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांनी डॉ. बाबासाहेब यांच्या बद्दल बोलताना   आपली राज्यघटना घडवण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळेच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. बाबासाहेब हे एक महान समाजसुधारक आणि अभ्यासक होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारस्वतंत्र भारताचे पहिले कायदेपंडित आणि दलितांचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे निधन झाले होते. म्हणून ६ डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांनी दलितांची स्थिती सुधारण्यासाठी खूप काम केले आणि अस्पृश्यता संपवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. म्हणूनच त्यांना बौद्ध गुरू मानले जाते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरते भारतीय संविधान तयार करणारे पहिले कायदा मंत्री आणि समितीचे अध्यक्ष होते. भारताचा कायदासुव्यवस्था आणि राज्यघटना तयार करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे योगदान आहे. दलितांवर होत असलेल्या भेदभावाच्या ते नेहमीच विरोधात होते. त्यांनी दलितांच्या समर्थनार्थ नवीन कायदे तयार केले आणि त्यांना इतर जातींप्रमाणे शिक्षण आणि समान अधिकार दिले.

          भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ऑक्टोबर २०१६ रोजी चैत्यभूमीस भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली. मोदी हे या स्मारकास भेट देणारे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीसरकारने लंडन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे घर खरेदी करून ऐतिहासिक स्मारकघोषित केले. त्याच बरोबर इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देत असल्याचे पत्र सन २०१५ मध्ये तत्कालीन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. इंदू मिलची जागा ताब्यात घेवून त्या जागेवर पंतप्रधान यांच्या हस्ते ११ ऑक्टोबर २०१५ रोजी स्मारकाचे भूमिपुजन करण्यात आले. असे शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांनी सांगितले.

           यावेळी ज्येष्ठ नेते धोंडीराम जावळे,सतीश पंडित, राजेंद्र पाटील, प्रवीण पाटील, नगरसेवक मनोज साळुंखे, अमित जावळे, सौ.अश्विनी कुबडगे, सागर कचरे, आकाशा मुल्ला, सलीम शिकलगार, शिवानंद रावळ, प्रितम बोरा, राजेंद्र बोहरा, रामसागर पोटे, शुभम बरगे, नगरसेवक किसन शिंदे, सचिन पवार, नितीन साळुंखे, आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.