तंदूरुस्त बंदोबस्त उपक्रम आदर्शवत- अण्णासाहेब जाधव

सौ सरस्वती रामकिशोर धूत चेरीटेबल ट्रस्ट, जिला माहेश्र्वरी सभा यांच्या पुढाकार

इचलकरंजी,: विजय मकोटे 

दि. २४ः `गणेश विसर्जन बंदोबस्तात पोलीस रात्रंदिवस अग्रेसर राहून आपले कर्तव्य पार पाडत असतात. अशावेळी दरवर्षी पोलिसांच्या तंदुरुस्तीसाठी सरस्वती रामकिशोर धूत ट्रस्ट आणि कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा आपले सामाजिक कर्तव्य जपत आले आहे. यामुळे या औद्योगिक शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्हाला अधिक मोठा हातभार लागत आहे,` असे प्रतिपादन अपर पोलीस अधिक्षक अण्णासाहेब जाधव यांनी केले.येथील सौ. सरस्वती रामकिशोर धूत चैरिटेबल ट्रस्ट वआणी कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा यांच्या सहकार्याने यंदाही गणेश विसर्जन मिरणूकीतील बंदोबस्तावर असणा-या पोलिसांसाठी तंदूरुस्त बंदोबस्त घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. मराठा मंडळ सांस्कृतीक भवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमास पोलीस उप अधिक्षक विक्रांत गायकवाड, माहेश्वरी सभेचे चंदनमल मंत्री, डाॅ. एस. पी. मर्दा आदींच्या हस्ते सुमारे ८५० पोलिसांना चिक्की, राजगिरा लाडू या पौष्टीक आहारासह मिनरल पाण्याची बाॅटल यांचे वाटप करण्यात आले.
कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष नितीन धूत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले, `इचलकरंजी पोलिस दलाने यंदा शहरातील गणेशोत्सवाला शिस्त लावली. सकाळ माध्यम समुहाच्या सहकार्याने पोलिसांसाठी तंदूरुस्त बंदोबस्त उपक्रमांसह गेल्या कांही वर्षात अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. शहराच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे आरोग्य जपण्यासाठी येणा-या काळात त्यांच्यासाठी भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन केले जाणार आहे.`श्रीकांत मंत्री यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांचा सर्व पोलीस अधिका-यांचा माहेश्वरी युवा संघटनेच्या आरोग्यम पुस्तिकेसह शाल देवून सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन मुकेश खाबाणी यांनी केले. आभार पंडित कोंडेकर यांनी मानले नियोजन माहेश्वरी सभा चे शिवप्रसाद तापडीया, सुरेंद्र हेडा,हरीश सारडा, आनंद बांगड, कृष्णकांत भूतडा, दिनेश बाहेती
आदींनी केले.
व्यासपिठावर पोलीस निरिक्षक शरद मेमाणे, महेश चव्हाण, गजेंद्र लोहार, सचिन सुर्यवंशी, प्रमोद शिंदे, गोरख चौधर, सहाय्यक पोलीस निरिक्षक विकास शिंदे यांच्यासह माहेश्वरी सभेचे लालचंद गट्टाणी, शांतीकिशोर मंत्री, सुरेश दरगड, रामनिवास मुंदडा, लक्ष्मीकांत बांगड, बजरंग काबरा, दयानंद बाहेती, रामुशेठ मुंदडा, , श्रीकांत बंग, रामनारायण गट्टाणी, नंदकिशोर भुतडा, धनराज डाळ्या, सत्यनारायण धूत, मनोज राठी, मुरली हेडा, सुरेश बांगड, बालकिसन टुवाणी, उमेश राठी, संजय सोमाणी, रामदेव राठी, मनोज सारडा आदी उपस्थीत होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.