श्री दत्त शिरोळ चा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ उत्साहात संपन्न

शिरोळ : राम आवळे 

दि.२४: श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. शिरोळचा सन२०२६-२७  च्या५५  व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ उद्योग समूहाचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ऊर्जांकुर कडील बॉयलरचा चेअरमन रघुनाथ देवगोंडा पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सुशीला रघुनाथ पाटील या उभयंतांच्या शुभहस्ते विधिवत सकाळी साडेनऊ वाजता संपन्न झाला. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक संचालक अरुण कुमार देसाई,संचालिका विनया घोरपडे,संचालक अनिल कुमार यादव, बाबासो पाटील, विश्वनाथ माने, शेखर पाटील, बसगोंडा पाटील, ऍड. प्रमोद पाटील, निजामसो पाटील, अमर यादव, दरगु माने गावडे, ज्योती कुमार पाटील, सिदगोंडा पाटील,सुरेश कांबळे, संचालिका संगीता पाटील कोथळीकर,अस्मिता पाटील,संचालक इंद्रजीत पाटील,रणजीत कदम, महेंद्र बागे,विजय सूर्यवंशी,मलकारी तेरदाळे,बाळासाहेब पाटील हालसवडे,रावसाहेब नाईक, अनंत धनवडे, मंजूर मेस्त्री,कामगार प्रतिनिधी प्रदीप बनगे,कार्यकारी संचालक संजीव देसाई,को जन मॅनेजर व्ही आर इंगळे यांचेसह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील म्हणाले श्री दत्त उद्योग समूहावर आपण प्रेम करणारी महाराष्ट्र कर्नाटक भागातील सभासद बंधू मंडळी,कार्यकर्ते,हितचिंतक मनापासून आणि उत्साहात या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले तसेच याप्रसंगी त्यांनी सर्व सभासद बंधूंना आपला सर्व ऊस आपल्याच कारखान्यास गाळपास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन केले. कारखान्यास मिळालेल्या पुरस्काराबद्दल बोलताना म्हणाले की हा पुरस्कार कारखान्याचे सर्व सभासद कामगार हितचिंतक यांच्या एक जुटीचा हा पुरस्कार आहे यावेळी कारखान्याला सन 2024 2025 या हंगामासाठी उच्च साखर उतारा असलेल्या क्षेत्रातील सर्वोत्तम ऊस विकास या श्रेणीतील प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व कामगारांच्या वतीने उद्यान पंडित गणपतराव पाटील यांचा सत्कार कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी तर चेअरमन रघुनाथ पाटील यांचा सत्कार कामगार प्रतिनिधी बाळासाहेब बनगे यांनी व व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक यांचा सत्कार कामगार युनियनचे सेक्रेटरी अरुण पाटील यांनी केला. याप्रसंगी सर्वांचे स्वागत कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी केले यावेळी त्यांनी आज साखर उद्योगासमोर अनेक आव्हाने आहेत दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे पण दत्त महाराजांच्या कृपेने चालू गळीत हंगाम हा अत्यंत चांगल्या पद्धतीने करून उच्चांकी गाळप करण्यास कामगार बंधूंनी सहकार्य करावे तसेच आपल्या कारखान्याला शेती विभागाला उत्कृष्ट ऊस विकासाचा पुरस्कार मिळाला तसाच पुरस्कार अन्य विभागाला मिळावा यासाठी खास प्रयत्न करावेत अशी विनंती केली आभार कामगार प्रतिनिधी प्रदीप बनगे यांनी मानले.

याप्रसंगी श्री दत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर व त्यांचे पदाधिकारी शर्करा औद्योगिक श्रमिक संघ व कामगार सोसायटीचे सर्व पदाधिकारी, डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उदगाव बँकेचे संचालक व पदाधिकारी,दत्त भांडारचे सर्व पदाधिकारी,तसेच शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत आसगावकर, एम एस सी बँकेचे बँक इन्स्पेक्टर विलास वैद्य,जयसिंगपूरचे नगरसेवक संजय पाटील कोथळीकर, शिरोळचे माजी नगरसेवक पंडितराव काळे, नासर पठाण, रावसाहेब गळतगे,महादेव कुलकर्णी, बापू गंगधर,शिवाजी कोळी,रावसाहेब चौगुले, श्रीकांत गावडे,बाळासाहेब कोळी, कृष्णा भाट,बाबासो पुंदे,शहाजी गावडे, गजानन कोळी, आयआय पटेल, धरणगुत्तीचे तंटामुक्त अध्यक्ष काकासो पाटील, माजी सरपंच भालचंद्र लंगरे,लक्ष्मी सेवा सोसायटी चेअरमन अशोक पाटील, संचालक निरगुंडा पाटील,भाऊसाहेब पाटील, आप्पासाहेब खोपाडे,जयसिंगपूरचे माजी नगरसेवक नितीन बागे, अजित वराळे,मुनाफ जमादार विश्राम कोळी, मोतीलाल बारगैर,अशोक शिरढोणे, दादगोंडा पाटील, चांद इनामदार,शिवमुर्ती देशिंगे, सुरेश चौगुले, चांद कोल्हापुरे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी यांचेसह महाराष्ट्र व कर्नाटकातील बहुसंख्य सभासद उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.