सहकारी सूतगिरण्यांच्या विकासाला नवी दिशा

प्रकल्प अहवालाची किंमत ₹८०.९० कोटींवरून ₹११८ कोटी करण्याबाबत उच्चस्तरीय समितीची बैठक

मुंबई :अजमल खान 

दि.२३ : सहकारी सूतगिरण्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी त्यांच्या प्रकल्प अहवालाची सुधारित किंमत निश्चित करण्याबाबत मंत्रालय, मुंबई येथे उच्चस्तरीय समितीची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. बैठकीत सहकारी सूतगिरण्यांच्या प्रकल्प अहवालाची किंमत ₹८०.९० कोटींवरून ₹११८ कोटी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. २५ हजार ५३६ चात्यांच्या बांधकाम व यंत्रसामग्रीच्या कोटेशनच्या आधारे महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाने वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने यांच्याकडे सुधारित प्रकल्प अहवाल सादर केला होता. वस्त्रोद्योग आयुक्तालयाने आवश्यक शिफारशींसह हा अहवाल महाराष्ट्र शासनाकडे सादर केला आहे.

         बैठकीस आमदार रणधीर सावरकर, वस्त्रोद्योग सचिव शैला ए., वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव, नियोजन विभागाचे प्रधान सचिव, वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने, महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, वस्त्रोद्योग उपसचिव श्रीकृष्ण पवार, खाजगी सचिव प्रल्हाद रोडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.