गणेश विसर्जन मिरवणुकीत रोटरी क्लबतर्फे १५ हजार कापसाचे बोळे वाटप
ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांच्या कानांचे संरक्षण करण्यासाठी उपक्रम
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.२८: अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठ्या आवाजातील डीजे साउंडमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांच्या कानांचे संरक्षण व्हावे, यासाठी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने नागरिकांना १५ हजार कापसाचे बोळे वाटप करण्यात आले.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी शहरातील प्रमुख मार्गांवर लहान मुले, महिला, पुरुष तसेच वृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. विविध गणेशोत्सव मंडळांकडून मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे साउंडचा वापर केला जातो. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा तसेच ध्वनी प्रदूषणापासून त्यांच्या कानांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने रोटरी क्लबने हा उपक्रम राबविला.
यावेळी लहान मुले, महिला, पुरुष व वृद्ध नागरिकांना कापसाचे बोळे वितरित करून ध्वनी प्रदूषणापासून कानांचे संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले.या उपक्रमावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष पंकज कोठारी, सेक्रेटरी सुनील येळरुटे, प्रकाश गौड, शिवदास कित्तुरे, संजय घायतिडक, प्रमोद धुत्रे, अनिल भुतडा, सत्यनारायण धूत, राजाराम जाधव, मनीष मुनोत, राजू पाटील, सुनील सातपुते, सुजित मगदूम, उत्तम रुग्गे, सुरेश कराळे यांच्यासह रोटरी व क्रेडाईचे पदाधिकारी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.