शरद फार्मसीच्या विद्यार्थिनींचे राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेत यश
तांत्रिक प्रश्नमंजुषा स्पर्धेत उपविजेतेपद; फैजा शिकलगार आणि सफिया शेख यांची उल्लेखनीय कामगिरी
.यड्राव :राम आवळे
दि.२९: येथील शरद कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थिनींनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE), मुंबई यांच्या अंतर्गत आयोजित राज्यस्तरीय तांत्रिक प्रश्नमंजूषा स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. फैजा मूसा शिकलगार आणि सफिया महमद शेख यांनी या स्पर्धेत सहभाग घेत महाविद्यालयाचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल केले.महागाव येथील संत गजानन महाराज रूरल फार्मसी कॉलेजमध्ये ही स्पर्धा पार पडली. या यशासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या गौरी फडके आणि प्रा. एस. आर. विठ्ठण्णा यांचे मार्गदर्शन लाभले.विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.