दत्त साखर शिरोळच्या कै. दत्ताजीराव कदम व्यायाम शाळेतील तीन खेळाडूंची राज्य व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!
शिरोळ : राम आवळे
दि.२९ :श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. दत्तनगर शिरोळ अंतर्गत असलेल्या कै.दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळ ट्रस्ट च्या व्यायाम शाळेतील तीन गुणवान खेळाडूंची विविध राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी निवड झाली आहे. या घवघवीत यशामुळे खेळाडूंमध्ये व परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.शालेय राज्यस्तर मल्लखांब स्पर्धेसाठी कु.वेदांत अनिल गावडे याची निवड झाली आहे.मुंबई विद्यापीठांतर्गत झालेली कुस्ती व ज्युदो या खेळातील वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या ‘ऑल इंडिया’ राष्ट्रीय स्पर्धेसाठी कु.सर्वोदय संजय देबाजे या खेळाडूची निवड झाली आहे.शिवाजी विद्यापीठांतर्गत झालेल्या रोप मल्लखांब स्पर्धेतून ‘ऑल इंडिया’ राष्ट्रीय स्पर्धेसाठी जयसिंगपूर कॉलेजमधून कु.सृष्टी भानुदास माने हिची निवड झाली आहे.
या सर्व यशस्वी खेळाडूंचा दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील, कारखान्याचे चेअरमन रघुनाथराव पाटील,संचालक शेखर पाटील,नितीन बागे, ज्योतीकुमार पाटील,शरदचंद्र पाठक व सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करून पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.या खेळाडूंना उद्यान पंडित गणपतराव पाटील व मंडळाचे अध्यक्ष संजीवकुमार देसाई,सचिव निलेश पाटील,सदस्य- विलासराव माने व प्रशिक्षक- संजय देबाजे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.