श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या अल्पिता शेखची किशोर गटात कबड्डी स्पर्धेसाठी निवड

इचलकरंजी: संजय आंबे

दि 23 महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन मार्फत परभणी येथे दिनांक 21 ते 23 डिसेंबर या कालावधीत 14 वर्षाखालील किशोर गटात कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल इचलकरंजीची इयत्ता आठवी मधील विद्यार्थिनी कु. अल्पिता शेख हिची कोल्हापूर जिल्हा संघात निवड झाली आहे

लहानपणापासूनच तिला खेळाची आवड आहे पालकांचे प्रोत्साहन व शाळेचे पाठबळ यामुळे तिला हे यश संपादन करणे शक्य झाले आहे.

श्री ना.बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवासजी बोहरा शेठजी, चेअरमन श्री हरीशजी बोहरा , व्हाईस चेअरमन मा. श्री उदयजी लोखंडेसो ट्रेझझर राजगोपालजी डाळ्या, सेक्रेटरी श्री बाबासाहेब वडींगेसो स्कूल कमिटी चेअरमन श्री मारुतराव निमणकर या पदाधिकाऱ्यांनी अल्पिताचे अभिनंदन केले व संस्थेमार्फत तिचा सत्कार करून तिला पुढील खेळासाठी शुभेच्छा दिल्या

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका श्रीमती गोंदकर एस. एस. , उपप्राचार्य श्री पाटील आर. एस. , उपमुख्याध्यापिका सौ भस्मे एस.एस. व पर्यवेक्षक श्री कांबळे व्ही. एन यांनी सुद्धा अल्पिताचे अभिनंदन केले

क्रीडा विभाग प्रमुख श्री शेखर शहा सर यांचे अल्पिताला विशेष मार्गदर्शन लाभले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.