विचित्र अपघात वाहतूक ठप्प
कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने तीन वाहनांची विचित्र धडकः दोन जखमी
रत्नागिरी: अस्लम खान
दि: १ जानेवारी रत्नागिरी देवरूख मार्गावरील बावनदी येथे कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने तीन वाहनांची विचित्र धडक होऊन अपघात घडला . यामुळे रत्नागिरी देवरुख मार्गावरील वाहतूक ठप्प आहे.बावनदी ते निवळी व बावनदी ते वांद्री अशा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती घटना स्थळावरून प्राप्त झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कंटेनर ला हटवण्यासाठी क्रेन ला देखील पाचारण करण्यात आले आहे
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.