महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना जिल्हा रत्नागिरी ची निवडणूक बिनविरोध

मुश्ताक तांबे जिल्हाध्यक्ष तर सचिव हिदायत नाईक

रत्नागिरी : मेहरुनिसा साखरतर

दि १ जानेवारी नुकताच चिपळून येथील महाराष्ट्रराज्य उर्दू शिक्षक संघटना जिल्हा रत्नागिरी ची जनरल सभा गोवळकोट उर्दू शाळा तालुका चिपळूण येथे कोविड १९ च्या अधिन खेळीमेळीच्या वातावरणात श्रीयुत ताजुद्दीन परकार विस्तार अधिकारी उर्दू यांच्या अध्यक्षते खाली पार पडली.सदर कार्यक्रमात दिवंगत थोर व्यक्तिं तसेच दिवंगत शिक्षकांना आदरांजली वाहण्यात आली.

रत्नागिरी जिल्ह्यातील नवीन उर्दू विस्तार अधिकारी म्हणून नियुक्त झालेले श्रीयुत ताजुद्दीन परकार आणि श्रीयुत मुख्तार इब्जी यांच सत्कार राज्य सदस्य माननीय शौकत काजी आणि मावळते अध्यक्ष अ. रहमान कुरेशी यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्ह्यातील उर्दू माध्यमातील शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. शेवटी महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना जिल्हा रत्नागिरी ची बिनविरोध निवड करण्यात आली.

जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून मुश्ताक तांबे, उपाध्यक्ष अहमद नाडकर, इक्बालअहमद दऴवी, मकसूद शेख सचिव हिदायत नाईक, कार्याध्यक्ष जियाउल्लाह खान, कोषाध्यक्ष आसिफ मुरूडकर यांची नियुक्ती करण्यात आली. सदर कार्यकारिणीस उर्दू मराठी माध्यमातील अनेक शिक्षकांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस भरघोस शुभेच्छा दिल्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.