कोकणांत कोल्हापूर स्टाइलने कोरोंना योद्धाचा महासत्कार
महालक्ष्मी टाइम्सचा उपक्रम कौतुकास्पद:आ. शेखर निकम
रत्नागिरी:अस्लम खान
दि:18जानेवारी धामणी ता संगमेश्वर येथे इचलकरंजी येथून प्रकाशित होणार्या आणि कोल्हापूर सांगली रत्नागिरी येथे वितरण होत असलेल्या सा.महालक्ष्मी टाइम्स च्या वतीने कोरोंना महामारी काळात माणुसकीचा हात देणार्या योद्धाचा कोरोंना योद्धा म्हणून महासत्कार करणात आला.सदरचा सोहळा मुंबईसंगमेश्वर रोडवरील हॉटेल ड्राइव इन सांस्कृतिक सभागृहात शासन नियमाचे पालन करत मोठ्या उत्साहात पार पडला.या सत्कार सोहळ्यास संगमेश्वर चिपळूण विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाहुण्याचे स्वागत आणि प्रास्ताविक संपादक फिरोज शैख यांनी केल .प्रास्ताविक भाषणात संपादक शैख म्हणले अल्पकाळात नाव लवकिक केलेल्या सा महालक्ष्मी टाइम्सने आपल्या वृतपत्राला इचलकरंजी येथून प्रकाशित करत,त्याला आपल्या दर्जेदार मांडणी, आकर्षक जाहिराती,सडेतोड लिखाण,आणि निर्भीड नि:पक्ष पत्रकारितेचा खरा आरसा ची भूमिका घेत कोल्हापूर जिल्हासह सांगली रत्नागिरी जिल्हात पोहचवला आहे. वृतपत्राच्या माध्यमातून अनेक उपक्रम ही राबवले जात आहेत समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणार्या गुणीजनाचा पुरस्कार देवून सत्कार ही केला आहे.कोरोंना महामारीच्या काळात सामाजिक बांधिलकी जपत मानव सेवा देणार्या योद्धाचा इचलकरंजी,कोल्हापूर येथे कोरोंना योद्धा म्हणून डिसेंबर 2020 मध्ये महासत्कार करणात आला होता. त्याचाच एक भाग म्हणून सदरचा सत्कार सोहळा येथे 17 जानेवारी रोजो आयोजित करण्यात आला होता.सदर सोहळ्यास निवृत्त वायुसेना अधिकारी श्री आर बी पाटील ,पुणे हे अध्यक्ष म्हणून लाभले.या वेळी शिवसेना पदअधिकारी राजेंद्र महाडीक,जिल्हा परिषेद माजी अध्यक्ष रमेश थेराडे,महालक्ष्मी टाइम्सचे सस्थापक संपादक, फिरोज शैख,कॅप्टन हनिफ खलफे,सामाजिक कार्यकर्ते यूयुते आर्ते ,रमजान गोलंदाज याची उपस्थिती होती.
कोरोंना महामारीत मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे अंतविधी दफन, दहन करण्याचे महान कार्य करणार्या युनिक फाऊंडेशन च्या दिलवार कोंडकरी यांना मुर्त्यु पश्चयात सन्मानित करत यावेळी आदरांजली वाहण्यात आली
आपल्या मनोगतात आमदार शेखर निकम म्हणले कोकणात कोल्हापूर स्टाइलने कोरोंना योद्धांचा महासन्मान सोहळा महालक्ष्मी टाइमच्या माध्यमातून पहिल्यांदाच पाहावयास मिळाला.वृतपत्र जेव्हा सामाजिक बांधिलकी जपते तेव्हा काम करणार्याला आणखी बळ मिळते. एक छोटसं साप्ताहिक घाटावरून येत आणि कोकोणी माणसाच्या कामाची दखल त्याला सन्मानित करत खरोखरच महालक्ष्मी टाइम्स चे आनि त्याचा टीमच कौतुक करावस वाटत.
या वेळी कोरोंना योद्धा म्हणून पोलिस कर्मचारी सुशांत पवार ,डॉ गणी सुतार, डॉ रमेश भावे,डॉ रघूनाथ तोडकर,डॉ श्रद्धा कुवळेकर.आरोग्य सेवक सपना दळवी,प्रमोदींनी चव्हाण,संदीप ढेकणे,आशा समिना काझी, वनिता कदम,मानसी शिर्के, सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत साळुंखे,कॅप्टन हनिफ खलफे,मजीद नेवरेकर,अनिरुदध कांबळे,अमित सावंत,फरजणा पठाण,नाइमा शाह,सय्यद कादरी,यूयुस्तू आर्ते,कैसर खान, दिलशाद अंसारी,अर्चिता कोकाटे,किर्ति खुल्ये,महेरूनिसा साखरतर,रोशन शिंदे,प्रतीक देसाई,जितेंद्र पेंढारी, ग्रामपंचायत पदंअधिकारी दत्तात्रय गायकवाड,राम शिंदे,शमिका पाटोळे,हनिफ वलेले,महमद दसुरकर,प्रगति शिर्के,लतेश म्हसकर,शादाब काझी.पत्रकार अस्लम खान,धनाजी भांगे आदीचा कोरोंना योद्धा म्हणून सन्मान पत्र शाल पुष्प देवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर सोहळ्यात महमद रफी साखरतर व कु किर्ति वाडकर यांनी आपल्या सुमधूर आवाजानि उपस्थित यांचे मनोरंजन केले.सूत्रसंचलन प्रांजल मोहिते यांनी केले ,या सत्कार सोहळ्यासाठी पत्रकार वहाब दळवी,मुजीब खान,बशीर खान,अस्लम खान,धनाजी भांगे,सचिन पाटोळे,नियाज खान,शब्बीर मजगावकर, विशाल रापटे यांनी विशेष मेहनत घेतली.तर कोल्हापूरचे प्रतींनिधी विजय धंगेकर,रेणु पोवार,अर्जुन पोवार विशेष याचे सहकार्य लाभले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.