श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींची राष्ट्रीय टँगसुडो स्पर्धेसाठी निवड
इचलकरंजी: प्रतिनिधी
दि २१ जानेवारी : टँगसुडो स्पोर्ट्स ऑफ महाराष्ट्र मार्फत जिल्हास्तरीय टँगसुडो स्पर्धा कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या .त्यामध्ये 18 वर्षाखालील गटात पायल लघु वाघमारे हिचा प्रथम क्रमांक आला तसेच 14 वर्षाखालील गटात राजश्री राजेश कामत हिचा द्वितीय क्रमांक आला.या विद्यार्थिनींची नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय टँगसुडो स्पर्धेसाठी निवड झाली.नाशिक येथे सुद्धा यांनी उज्वल यश संपादन करीत पायल वाघमारे व राजश्री कामत यांनी 18 व 14 वर्षाखालील गटात द्वितीय क्रमांक पटकावला.7 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या टँगसुडो राष्ट्रीय स्पर्धेसाठी यांची निवड झाली आहे
ना.बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवासजी बोहरा शेठजी, चेअरमन श्री हरीशजी बोहरा , व्हाईस चेअरमन मा. श्री उदयजी लोखंडेसो ट्रेझझर राजगोपालजी डाळ्या, सेक्रेटरी श्री बाबासाहेब वडींगेसो स्कूल कमिटी चेअरमन श्री मारुतराव निमणकर या पदाधिकाऱ्यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका श्रीमती गोंदकर एस. एस. , उपप्राचार्य श्री पाटील आर. एस. , उपमुख्याध्यापिका सौ भस्मे एस.एस. व पर्यवेक्षक श्री कांबळे व्ही. एन यांनी सुद्धा खेळाडूंचे अभिनंदन केलेक्री डा विभाग प्रमुख श्री शेखर शहा सर , महेश गवंडी सर यांचे खेळाडूंना विशेष मार्गदर्शन लाभले
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.