काँग्रेस डिजिटल सदस्य नोंदणी एका ब्लॉकला किमान २५ नोंदणी सदस्य द्यावेत व त्यांना लिंक द्यावी-अशोकराव जाधव
रत्नागिरी न्युज एडिटर :-मुजीब खान
अखिल भारतीय काँग्रेस कमेटीने आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीने डिझीटल सदस्य नोंदणी ब्लॉक (तालुक्याला) ला चार नोंदणी सदस्य दिले आहेत ते पुरेसे नसुन काँग्रेस सदस्य नोंदणी बहूसंख्य करायची असल्यास किमान २५ नोंदणी सदस्य देवून त्यांना लिंक द्यावी तर सदस्य नोंदणी होईल आणि पक्ष सदस्य नोंदणी अभियानामध्ये अग्रेसर राहील व पक्षाचे हात चिन्ह व कार्यकर्ता सर्व सामान्य जनते पर्यंत पोहचेल व पक्ष रूजवेल त्या साठी तरी प्रत्येक ब्लॉक( तालुका ) ला किमान २५ नोंदणी सदस्यांना लिंक द्यावी अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमीटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांचेकडे रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमेटीचे ऊपाध्यक्ष आणि प्रवक्ते अशोकराव जाधव यांनी केली आहे .
या बाबत अशोकराव जाधव पुढे म्हणाले की जनते मध्ये काँग्रेस बद्यल सकारात्मक मत आहे काँग्रेसचीच सत्ता हवी असे जनतेचे मत आहे त्याचा पुरावा म्हणजे महाराष्ट्रातील नगर पंचायतीच्या निवडणूकीत काँग्रेस दोन नंबरला आहे अशी सकारात्मक परिस्थिती केंद्रीय नेतृत्व सोनियाजी गांधी , राहूल गांधी , प्रियांका गांधी , एच के पाटील , मुकूल वासनीक यांचे मुळे तसेच प्रदेश अध्यक्ष आ नाना भाऊ पटोले , मा अशोकरावजी चव्हाण , पृथ्वीराज चव्हाण ,बाळासाहेब थोरात , नितीन राऊत , सुनिल केदार , सतेज ऊर्फ बंटी पाटील , विश्वजीत कदम यांचे नेतृत्वामुळे निर्माण झाली असताना त्याचा फायदा सदस्य नोंदणी साठी नक्कीच होऊ शकतो त्यामुळे प्रत्येक तालुक्याला २५ नोंदणी सदस्य द्यावेत त्या मुळे विक्रमी सदस्य नोंदणी करण्यासाठी क्रियाशील व निष्ठावान कॉंग्रेस जनांना संधी मिळेल नाहीतर मर्जीतील चार सदस्य आणि त्यांनी केलेले मर्जीतील सभासद त्यामुळे पक्षाचे सभासदच निष्ठावान काँग्रेसवाला मात्र पक्षाबाहेर अशी परिस्थिती निर्माण होयील अशी साधार शंका व्यक्त केली कारण दोन तारखे नंतर ज्या लोकांना नोंदणी सदस्य लिंक देवून नेमणुका केल्या त्यांना सर्वच बाजूनी मर्यादा पडत असल्याने आणि डिजिटल नोंदणी तशी थोडीशी किचकट आणि टेकनिकल ही आहे तरी चार नोंदणी सदस्य गावांची भौगोलिक परिसर पाहता त्यांची कितीही इच्छा शक्ती असली तरी फिजीकली , आर्थिक , दृष्टा शक्य दिसत नाही म्हणून किमान २५ नोंदणी सदस्य करावेत व त्यांना लिंक द्यावी काँग्रेस जनतेच्या सदस्य नोंदणीतून पुन्हा जनतेची सेवा करून सत्तेपर्यंत येवू शकते तरी माझ्या मागणीचा पक्ष नक्कीच विचार करेल असे अशोकराव जाधव यांनी सांगितले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.