ट्रक चालकाकडील 20 हजार काढून घेवून खून करून पसार झालेल्या दोघांना 24 तासात दिल्लीतून केले अटक

कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे पथकाची कारवाई

कोल्हापूर :प्रतिनिधी

दि:२४ जानेवारी  टँकर चालकाचा खून करुन पसार दोघा आरोपींना 24 तासात दिल्ली येथून स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली. संशयित कमलजित सुदेशकुमार सिंग  ,वय५३, रा. मंडवाल, पटियाला पंजाब व बलविंदर सादा सिंग ,वय२५, रा. खानपूर खुर्द, पटियाला, भेडवाल अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनी फोंडा घाट ,ता. राधानगरी हद्दीमध्ये टँकर चालक तरलोकसिंग धरमसिंग वय ५४, रा. हायातनगर, गुरुदासपूर, पंजाब  याच्या डोक्यात लोखंडी गज घालून खून करुन पळून गेले  होते. अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी प्रसार. माध्यमांना दिली.

पोलीस सुत्रा कडून मिळालेली माहिती अशी , राधानगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये फोंडाघाट येथे टँक क्रमांक पी. बी. ०६ बी. ए. ७६२६) चे केबीनमध्ये बेवारस पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत २२ जानेवारी रोजी मिळून आला. त्याच्या डोक्यास गंभीर दूखापत होवून मृत्यू झालेचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले. त्यानुसार खूनाचा गुन्हा दाखल करुन तपास करण्यात आला. टँकर हा स्पिरीट ने भरलेला असल्याने तो कोठून आला तो येण्याचा मार्ग, पेट्रोल भरणेचे ठिकाण व ट्रकमध्ये मिळालेल्या कागदपत्रावरुन ट्रक चालक तरलोकसिंग याचेसोबत असणाºया दोघा लोकांनी मारहाण करुन खून केल्याची दाट शक्यता निर्माण झाली. त्या दूष्टीने तपास केला असता संशयित कमलजित सिंग आणि बलविंदर सिंग हे दोघे खून करुन न्यू दिल्ली येथे पळून गेल्याचे तपासात पुढे आले. गुन्हे शाखेकडील सहायक निरीक्षक किरण भोसले, उत्कर्ष वझे, उपनिरीक्षक विनायक सपाटे यांच्या टिमने दिल्ली येथील रेल्वे स्टेशनवरुन दोघा संशयित आरोपींना अटक केली.
संशयित आरोपींकडे चौकशी केली असता, मृत तरकलोकिसंग धरमसिंग हा चालक म्हणून टँकर काम करीत होता. आरोपी कमलजित सिंग हा गेले पाच वर्षापासून त्याचे ओळखीचा असल्याने वेळ मिळेल तेव्हा त्याचे सोबत जात होता. पुर्वी क्लिनर म्हणून केलेले कामाचे पैसे येणे होते, त्यावरुन त्यांचेत वरचेवर वाद होत असे. चालक तरकलोकसिंग याचेजवळ वीस हजार रुपये होते, ते काढून घ्यायचे या हेतून त्याने साथीदार बलविंदर सिंग याला फोनकरुन सातारा येथे बोलवून घेतले. तेथून तिघेजण टँकर घेवून गोवा येथे जात असताना शेळपबांबर (ता. राधानगरी) गावचे हद्दीत फोंडा घाटात आलेवर आरोपींनी चालक तरकलोकसिंग याचे डोक्यात लोखंडी गजाने मारहाण केली. त्याला केबीनमध्ये जखमी अवस्थेत टाकून त्याचेजवळील पैसे घेवून दोघेजण पसार झाले होते. सदर कारवाईत शििवानंद कुंभार, शेष मोरे, पोलिस अमलदार उत्तम सडोलीकर, रणजीत कांबळे, अनिल जाधव, रफीक आवळकर, सुनिल कवळेकर, अजित वाडेकर, अमोल कोळेकर, सागर कांडगावे, ओंकार परब, राजेंद्र वरंडेकर, नामदेव जाधव , सचीन बेडखळे, सुरेश राठोड आदीचे सहकार्य लाभले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.