रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हापरिषदेचे 7 गट तसेच पंचायत समितीचे 14 गण वाढणार
रत्नागिरी:-मेहरुनिसा साखरकर
जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर निवडणूकाचे पडघम वाजू लागले आहेत. यंदाच्या निवडणूकीत मतदारसंघाची पुर्नरचना होणार आहे. नव्या पुर्नरचनेनुसार जिल्ह्यात सात जिल्हापरिषद गट आणि चौदा पंचायत समिती गण वाढणार आहेत.रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 55 गट आणि पंचायत समितीचे 110 गण आहेत.
नव्या पुर्नरचनेनुसार जिल्ह्यात 62 जिल्हापरिषद गट आणि 124 पंचायत समिती गण निर्माण होतील.नव्या निकषानुसार सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या महसूल गावाचे नाव जिल्हापरिषद गट किंवा पंचायत समिती गणाला दिले जाणार आहे.जुन्या निकषाप्रमाणे सर्वाधिक लोकसंख़्या असलेल्या ग्रामपंचायतीचे नाव जिल्हापरिषद गट किंवा गणाला दिले जात होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.