रत्नागिरी: अनिरुद्ध कांबळे
दि : १२ फेब्रुवारी रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म गाव असलेले आंबडवे येथे देशाचे राष्ट्रपती महामही मा. श्री राम नाथ कोविंद हे नतमस्तक होण्यासाठी दि १२ फेब्रुवरी रोजी आले होते
राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी शनिवारी सकाळी आंबडवे गावाला भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी डाॅ. आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिराच्या प्रांगणात विशेष कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. आंबडवे हे गाव तीर्थयात्रेसमान आहे. केंद्र शासनातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती जपणाऱ्या पाच स्थळांचा विकास करण्यात येत आहे. त्यामध्ये महू गाव, दीक्षाभूमी नागपूर, दिल्लीतील महापरिनिर्वाण क्षेत्र, मुंबईतील चैत्यभूमी आणि लंडनमधील आंबेडकर भवन यांचा समावेश आहे. त्यांपैकी चारही स्थळांना मी भेट दिली आहे. या पंचतीर्थ स्थळांच्या विकास कार्यक्रमात आंबडवे गावाचाही समावेश करावा. असे गौर गौरद्वार महामही श्री रामनाथ कोविंद यांनी यावेळी केले
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.