मराठा मंडळच्या वतीने देण्यात येणारे गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर

१८ फेब्रुवारी रोजी होणार पुरस्काराचे वितरण

इचलकरंजी:प्रतिनिधी

दि:१६ फेब्रुवारी : मराठा मंडळ, इचलकरंजी च्यावतीने शिवजयंतीनिमित्त देण्यात येणारे यंदाचे गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. याबाबतची घोषणा अध्यक्ष आनंदराव उदाळे यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष सचिन हळदकर यांच्यासह संचालक उपस्थीत होते. सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मण सावंत व आनंदराव जाधव यांना जीवन गौरव पुरस्कारांने सन्मानीत केले जाणार आहे.
पुरस्कार प्राप्त शिक्षक असे, महाविद्यालयीन विभाग – प्राचार्य डाॅ.विजय माने (व्यंकटेश महाविद्यालय), माध्यमिक विभाग – सुरेंद्र दास (गोविंदराव हायस्कूल), संजय साळुंखे (सरस्वती हायस्कूल), सौ.उमा जाधव (राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल), प्राथमिक विभाग – नारायण पाटील (हुतात्मा बाबू गेनू विद्यामंदीर), मंदाकिनी चिंदके (नूतन मराठी विद्यामंदिर), विलास रामाणे (आनंदीबाई कर्वे विद्यामंदिर), बालवाडी विभाग – सौ.उज्वलाराणी पाटील (अशोका बालवाडी), शिक्षकेत्तर कर्मचारी – तानाजी दाडमोडे (शहापूर हायस्कूल).
पुरस्कार वितरण १८ फेब्रुवारीरोजी सांयकाळी ६ वाजता माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्याहस्ते व प्रा.डाॅ.प्रदीप यादव यांच्या उपस्थीतीत होणार आहे. मलाबादे चौकातील मराठा मंडळाच्या प्रांगणात हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.