कडवई परिसरात शिवजयंती मोठ्या उत्साहपुर्ण वातावरणात साजरी

संगमेश्वर:-साद्दीक नायकोडी 

संगमेश्वर तालुक्यातील कडवई परिसरात विविध ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .शिवजयंती उत्सव समिती कडवई पंचक्रोशी ,रिक्षा संघटना , आयडियल ग्रुप, मैत्री क्रीडा मंडळ , वरदान क्रीडा मंडळ , तसेच कडवई फाटा व्यापारी संघटना यांच्या माध्यमातून विविध उपक्रमाद्वारे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला .यामुळे कडवई पंचक्रोशीत वातावरण शिवमय बनले होते.
शिवजयंती उत्सव समिती कडवई पंचक्रोशी च्या वतीने विविध राजकीय पक्ष तसेच विविध संघटना मधील शिवप्रेमींनी एकत्र येत कडवई बाजारपेठ येथे पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती साजरी केली .सकाळी शिवपूजन करण्यात आले . दुपारी तुरळ , चिखली ते भवांनगड अशी शिवज्योत काढण्यात आली .भवांनगड येथे भवानी माता तसेच शिवप्रतिमेचे पूजन सहायक पोलिसनिरीक्षक पी व्ही देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले .दुपारी कडवई बाजारपेठ येथे शिवचरित्र व्याख्याते श्रीनिवास पेंडसे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते .या संपुर्ण कार्यक्रमात सर्वधर्मीय शिवप्रेमी,राजकीय पदाधिकारी,मान्यवर व शिवप्रेमी उपस्थित होते .
भवांनगड येथे मैत्री क्रीडा मंडळ ,आयडियल ग्रुप तसेच राजू काकडे अकॅडमी,यांच्यावतीने सफसफाई मोहीम राबविण्यात आली होती यावेळी पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे यांनी स्वतः भवांनगड येथे जाऊन भवानी माता व शिवछत्रपतीचे दर्शन घेतले .कडवई फाटा व्यापारी संघटनेच्या वतीने सत्यनारायण महापूजा व हरिपाठ आशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .वरदान क्रीडा मंडळाच्यावतीनेही व्यायामशाळा येथे शिवपूजन करण्यात आले .
अशारितीने कडवई परिसरात अतिशय उत्साहात शिवजयंती मोठया उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली .या संपूर्ण कार्यक्रमात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी संगमेश्वर पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे व त्याच्या सहकाऱ्यांनी चोखपणे पार पाडली .

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.