Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
इचलकरंजी: विजय मकोटे
दि. 20 – 27 एचपी वरील यंत्रमागधारक ग्राहकांच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या अडचणीमुळे त्यांची वीज बिलातील सवलत रद्द झालेली होती. या प्रश्नांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सतेज उर्फ बंटी पाटील यांनी लक्ष घातले वस्त्रोद्योग मंत्री ना.अस्लम शेख यांना इचलकरंजी भेटीचे निमंत्रण दिले या प्रश्नाचे गांभीर्य समजावून सांगितल्यामुळे त्यांनी इचलकरंजी येथे येऊन वस्त्रोद्योगातील वेगवेगळे प्रश्न समजावून घेतले व तत्काळ 27 एचपी वरील यंत्रमाग ग्राहकांच्या साठी आँन लाईन नोंदणी साठी मुदतवाढीची घैषणा केली व तत्काळ त्याची अंमलबजावणी देखील करून हा प्रश्न सोडवला. याकामी ना. सतेज पाटील यांनी जी मदत केली त्याबद्दल इचलकरंजीतील सर्व यंत्रमाग संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी सर्वात प्रथम माजी नगरसेवक सागर चाळके यांनी प्रास्ताविक करून मंत्रीमहोदयांनी या प्रश्नांमध्ये लक्ष घालून इचलकरंजीतील यंत्रमाग उद्योगासमोरील हा जटिल प्रश्न तत्काळ सोडवून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. यानंतर इचलकरंजी पाँवरलूम असोसिएशनचे चेअरमन सतीश गोष्टी इरलो चे चेअरमन राजगोंडा पाटील जागृती संघटनेचे चेअरमन विनय महाजन इस्लोचे चेअरमन गोरखनाथ सावंत या सर्वांनी माननीय ना. सतेज पाटील पालकमंत्री कोल्हापूर यांचे मनःपूर्वक आभार मानले.
त्याचबरोबर गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित असलेल्या 75 पैसे वीज सवलतीचा प्रश्नांमध्ये आपण लक्ष घालावे व या सारखाच तोही प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा व यंत्रमाग उद्योगातील इतर सगळ्या विषयात मंत्रीमहोदयांनी इचरकंजीकरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून प्रश्नांची सोडवणूक करावी अशी विनंती इचलकरंजी इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह इस्टेट चे चेअरमन मा.राहुल खंजिरे केली
यानंतर सत्काराला उत्तर देताना मा. ना सतेज पाटील यांनी हे सरकार आपले आहे आपले सर्व ऐकून घेतले जाईल व आपले प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही दिली येत्या बुधवार गुरुवार रोजी ना.अस्लम शेख यांची वेळ घेऊन मी आपणास कळवतो आपण मुंबई येथे या त्यांचाही आपण यथोचित सन्मान करूया व आपले राहिलेल्या इतरही प्रश्नांची सोडवणूक करून घेऊया. त्याच बरोबर २०२३ ते २०२८ या सालासाठी तयार होणाऱ्या वस्त्रोद्योग धोरणा मध्ये आपल्याला आवश्यक योजनांचा समावेशही करून घेऊया असे प्रतिपादन केले. इचलकरंजीच्या सर्व प्रश्नांमध्ये मी आपल्या पाठीशी ठाम उभा आहे अशी ग्वाही दिली. याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय कांबळे शिवसेनेचे रवींद्र माने माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे रवी रजपुते, नारायण दुरगुडे, चंद्रकांत पाटील, सतीश गौड, अंबरीश सारडा, सचिन झंवर, सुरज दुबे,भाऊसो आवळे, सूरज मगदूम, दत्तात्रेय कनोजे, प्रवीण फगरे, हारुण खलिफा, प्रमोद खुडे, शेखर पाटील, पांडुरंग सोलगे
यांचेसह विविध संघटनांचे प्रतिनिधी व कारखानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Mahalaxmi times is weekly Marathi news paper.mainly working in three Dist.kolhapur,sangli n ratnagiri.along with print media we have face book pages, Instagram,youtube channel,web
news portal . namely news17 .
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.