डीकेटीईमध्ये ‘शेपिंग द फ्युचर’ या विषयावर कार्यशाळा संपन्न

नैतिक मुल्यासोबत अर्थार्जन करिअर हा विद्यार्थ्यांचा ध्यास असावा- डॉ संजय जाधव यांचे प्रतिपादन

 

इचलकरंजी : प्रतिनिधी

दि. २५ फेब्रुवारी ः डीकेटीई इन्स्टिटयूट, इचलकरंजी, इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आय.एस.टी.ई.) चाप्टर व डीकेटीईचे करिअर गायडन्स सेल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शेपिंग द फ्युचर’ या विषयावर विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी डीकेटीईमध्ये कार्यशाळेचे आयोजन केले होते. कलेत पदव्युत्तर शिक्षण (एम.ए. तत्वज्ञान, एम.ए. इतिहास, एम.ए. अर्थशास्त्र, एम.ए. इंग्रजी, एम.ए. मराठी) संपादन केलेले कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ.संजय जाधव, सी.ई.ओ. सिल्कलँड ग्रुप ऑफ बिझनेस, दुबई, युएई, यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यातील आव्हाने पेलण्यासाठी यशाचे विविध मंत्र दिले.
डॉ.संजय जाधव यांनी आपल्या आयुष्यातील अनुभव कथन केले. एका छोटया शहरातील विद्यार्थी म्हणून त्यांनी इंग्रजी बोलण्याच्या, शिष्टाचारांचे पालन करण्याच्या समस्या कशा हाताळल्या हे सांगत त्यांनी आध्यात्मिक पैलू, मानवी गरजा आणि विद्यार्थ्यांच्या जीवनातील विविध पैलुंना स्पर्श केला. विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यासाठी त्यांनी स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी आणि संत तुकाराम यांच्या जीवनातील विशेष उदाहरणे दिली. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्वाच्या कथांतून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. रतन टाटा, वॉरेन बफेट यासारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्वाच्या कथेतून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
तथाकथित व्हॉटसअ‍ॅप युनिव्हर्सिटी आणि सोशल मिडीयावर विश्‍वास ठेवू नका असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्राचे सखोल ज्ञान संपादन करुन त्यात कौशल्य प्राप्त करावे असा सल्ला दिला. त्यांनी युपीएससी मुलाखतीचा त्यांचा अनुभव सांगितला आणि ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्हयूला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच वैद्यकीय, कला, मानसशास्त्र आणि वाणिज्य क्षेत्रातील त्यांचे आयुष्यातील अनुभव सांगितले जे उपस्थित प्रत्येकासाठी प्रेरणादायी भेट होते. डॉ.जाधव, हे लेडी हार्डींग मेडिकल कॉलेज, दिल्ली येथे सर्जन आणि शस्त्रक्रिया मध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी वाणिज्य मंत्रालयात देखील काम केले आहे. सध्या ते सी.ई.ओ. सिल्कलँड ग्रुप ऑफ बिझनेस, दुबई, युएई येथे कार्यरत आहेत.
संचालक प्रा.डॉ.पी.व्ही.कडोले यांनी स्वागतपर भाषण करुन कार्यशाळा आयोजित करण्यामागचा उददेश विस्तृतपणे नमूद केला. डॉ. जाधव, श्री. आलासे, श्री. संतोष पाटील, आणि श्री. कलशेटटी या मान्यवरांचे स्वागत केले. करिअर गायडन्स सेल प्रमुख प्रा.डॉ.जे.एम. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा.पी.एन. गोरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा प्रतिसाद उदंड होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.