दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची

शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांचा लोककलांच्या माध्यमातून गावोगावी जागर

रत्नागिरी: प्रतिनिधी

दि.09 : गेल्या दोन वर्षात राज्यात राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आजपासून जिल्ह्यात शासनाच्या जन कल्याणकारी योजनांचा लोककलांच्या माध्यमातून जागर करण्यास प्रारंभ करण्यात आला.

लोकांसाठीच्या योजना सोप्या आणि लोकांच्या भाषेत सांगितल्या की त्या लोकांपर्यंत लवकर पोहचतात. भाकर संस्था लांजा, आधार सेवा ट्रस्ट रत्नागिरी व शाहीर रत्नाकर महाकाळ लोककला मंच, खेड  यांच्या कार्यक्रमाने या मोहिमेचा शुभारंभ आज झाला. खेड तालुक्यातील तहसील कार्यालय खेड, पंचायत समिती कार्यालय खेड, वावे तर्फे नातू, तीन बत्ती नाका खेड या गावामध्ये तसेच राजापूर तालुक्यातील नाटे व धाऊलवल्ली या गावांमध्ये आणि रत्नागिरी तालुक्यातील पाली बाजारपेठ व नाणीज येथे या ठिकाणी लोककलेच्या या कार्यक्रमास आजपासून प्रारंभ झाला आहे.

कोरोनामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसाना व पाल्यांना मदत, जलजीवन मिशन, ग्राहक संरक्षण कायदा, संजय गांधी निराधार योजना अशा विविध योजनांच्या माहितीचा यात समावेश आहे.

जिल्ह्यामध्ये आजपासून प्रारंभ झालेल्या या जागराचा नागरिकांना लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.