राजकारणातील हुकूमशाहीला धक्का देण्यासाठी कोल्हापूर उत्तर ‘ च्या रिंगणात
कोल्हापूर उत्तरं हाच माझा पक्ष :हाजी अस्लम सय्यद
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि. २२मार्च कोल्हापूर राजकारणात मी म्हणेल तीच पूर्व दिशा अशी भूमिका घेणाऱ्या हुकूमशाही प्रवृत्तीला धक्का देण्यासाठी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरल्याची घोषणा हाजी अस्तुम सय्यद यांनी पत्रकार बैठकीत बोलतांना केली.
९ २०१९ साली हातकणंगले लोकसभा मतदार संघात निवडणूक लढलेले हाजी अस्लम सय्यद यांनी गत निवडणुकीत तत्कालीन खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात लढताना दिड लाखाच्या आसपास मते घेतली होती. बहुजन वंचित आघाडी कडून लढलेल्या असालम सय्यद यांच्यामुळे राजू शेटटींना पराभव चाखावा लागला होता. शिवाय तो मतदारसंघ सय्यद यांच्यासाठी नवीनच होता. शिवाय लोकसभा मतदारसंघ असल्याने भाकाराने मोठा होता. ७२२ पैकी फक्त शंभर गावांपर्यंतच प्रचार मोहीम राबवता झाली होती. तरीही लक्षणीय मते मिळाली होती. कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ भाकाराने छोटा आहे. शिवाय या मतदारसंघात मोठा जनसंपर्क मसल्याने हुकुमशाहीला कंटाळलेले मतदार आपल्याला संधी देतील, घसा दाबा हाजी असलम सय्यद यांनी शेवटी बोलतांना केला.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.