जलशक्ती अभियान 2022 कार्यक्रमांतर्गत कॅच द रेन अभियानाबाबत बैठक संपन्न
रत्नागिरी: प्रतिनिधी
दि.01:- जिल्ह्यामध्ये जलशक्ती अभियान 2022 कार्यक्रमातंर्गत कॅच द रेन अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता छाया नाईक, उपजिल्हाधिकारी रोहयो अमिता तळेकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता दयानंद परवडी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी द.यो. दामा आदी उपस्थित होते.
या अभियानातंर्गत जलस्त्रोतांचे संरक्षण व नुतनीकरण, सांडपाणी व्यवस्थापन, पावसाच्या पाण्याचे संवर्धन, वृक्षलागवड, भूजल साठ्यामध्ये वाढ करणे इत्यादी कार्यक्रम राबविण्यात येणार असून याबाबतची माहिती जलशक्ती अभियानाच्या पोर्टलवर संबंधित विभागांनी वेळोवळी अद्यावत करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी बैठकीमध्ये दिल्या. तसेच नेहरु युवा केंद्र, एनएसएस, शाळा व महाविद्यालये, अंगणवाड्या, ग्रामसभा, विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून या अभियानाची जनजागृती करण्यात यावी, असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.
जलशक्ती जिल्हा जलसंधारण अधिकारी द.यो.दामा यांनी पोर्टलबाबतची माहिती उपस्थितांना दिली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.