लोकवस्तीत आलेली अजस्त्र मगर वन विभागामार्फत नैसर्गिक अधिवासात मुक्त
रत्नागिरी प्रतिनिधी
दि. ०5 : चिपळूण शहरानजीक शंकरवाडी येथील लोकवस्तीमध्ये 03 एप्रिल 2022 रोजी पहाटे ३.०० च्या सुमारास १२ फुटी अजस्त्र मगर आढळून आल्याची माहिती वन विभागास मिळाली. वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मगर पिंजऱ्यात बंदिस्त करून तिला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात मुक्त केली आहे.
हे रेस्क्यू ऑपरेशन विभागीय वन अधिकारी दिपक खाडे, सहायक वनसंरक्षक सचिन निलख, वनपरिक्षेत्र अधिकारी चिपळूण राजेश्री कीर यांच्या मार्गदशनाखाली श्री.सुर्वे, वनरक्षक,रामदास खोत, वनपाल व नंदू कदम, वाहनचालक यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले.
बंदिस्त करण्यात आलेली मगर १२ फूट लांब व अंदाजे ३०० किलोग्रॅम वजनाची असून ती मादी जातीची होती, तिचे वय अंदाजे ३४-४० वर्षे असावे, असे वन विभागाचे रेस्क्यू पथकाने सांगितले आहे.
शंकरवाडी येथील लोकवस्तीमध्ये पहाटे ३.०० च्या सुमारास लोकवस्तीत अजस्त्र मगरीला सुरक्षित पकडल्याने वन विभागाने दाखविलेल्या कार्यतत्परतेने मोठा अनर्थ टळला आहे. त्यामुळे परिसरातील लोकांनी वन विभागाचे व रेस्क्यू पथकामधील अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.