इचलकरंजी व्यापारी पत संस्थेला 67.58 लाखाचा निव्वळ नफा

चेअरमन साखरे यांची माहिती

इचलकरंजी : संजय आंबे
दि. ६ एप्रिल येथील इचलकरंजी व्यापारी सहकारी पत संस्थेने 38 व्या वर्षात पदार्पण केले असून सन 2021-22 सालात सर्व तरतुदी वजा जाता 67.58 लाखाचा निव्वळ नफा झाला, असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन सुर्यकांत साखरे यांनी दिली.
संस्थेचे वसुल भागभांडवल 64.79 लाख इतके असुन राखीव व इतर निधी 3 कोटी 81 लाख इतका आहे. अहवाल सालात संस्थेकडे 14 कोटी 20 लाख इतक्या ठेवी असुन संस्थेने 9 कोटी 92 लाख इतके कर्ज वाटप केले आहे. 10 कोटी 4 लाख इतकी गुंतवणुक संस्थेने केलेली आहे. संस्थेचे खेळते भांडवल 21 कोटी 23 लाख इतके आहे. संस्थेची थकबाकी नाममात्र म्हणजेच 4 लाख 95 हजार असून त्याचे येणे कर्जाशी शेकडा प्रमाण 00.49 टक्के इतके आहे. संस्थेचा निव्वळ एनपीए 3 लाख 1 हजार असुन त्याचे येणे कर्जाशी शेकडा प्रमाण 00.30 टक्के इतके नाममात्र आहे. संस्था गेली आठ वर्षे सतत सभासदांना 15 टक्के डिव्हिडंड देत असून स्थावर तारण, सोनेतारण व चारचाकी वाहन तारणासाठी 10 टक्के इतक्या सर्वसामान्य सभासदांना परवडणार्‍या व्याजदरात कर्जपुरवठा आहे. त्याला सभासदांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. संस्था संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढीकडे सातत्याने लक्ष देत आहे. सभासद व नागरिकांच्या सोयीसाठी चार वीज बिल भरणा केंद्रे कार्यरत असल्याचे चेअरमन श्री. साखरे यांनी सांगितले.
याप्रसंगी व्हा. चेअरमन शशिकांत शेटके, संचालक विलासराव गाताडे, बाळासो बरगाले, सुभाष तोडकर, दिलीप वणकुंद्रे, सुरेंद्र हुक्केरी, विलास चव्हाण, विलास कोरवी, नकुल झेले, सौ लक्ष्मीबाई पाटील, सौ. छाया कोंडारे, तज्ञ संचालक सुभाष पाटील, संजय वठारे उपस्थित होते. आभार व्यवस्थापक विश्‍वनाथ रोडे यांनी मानले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.