माजी सरपंच उदय गिते यांच्या सौजन्याने कबनुर मध्ये हायमास्ट पोलचे लोकार्पण

कबनूर : चंदुलाल फकीर

दि१९एप्रिल :येथील काँग्रेस कमिटीच्यावतीने व माजी सरपंच उदय गिते यांच्या सौजन्याने पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्य कबनुरमध्ये विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माजी सरपंच उदय गिते यांच्यामार्फत हायमास्ट पोल लक्ष्मी मंदिर, माळभाग कबरस्थानजवळ,कोल्हापूर रस्ता स्मशानभूमीजवळ व दर्गा शेजारीचे कबरस्थान या चार ठिकाणी काँग्रेस कमिटी प्रदेश सचिव शशांक बावचकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राहुल खंजिरे, सरपंच शोभा पोवार, उपसरपंच सुधिर पाटील, ग्रामपंचायत सदस्य सैफ मुजावर, वैशाली कदम, सुलोचना कट्टी व किशोर पाटील,राणी बोराडे, बाबासो कोकणे,अल्ताफ मुजावर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
कबनुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांतिवीर देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार सार्वजनिक वाचनालय गंगानगर, संत रोहिदास वाचनालय, कल्लाप्पाण्णा आवाडे ग्रंथालय व कबनुर ग्रामीण वाचनालय या चार सार्वजनिक वाचनालयांना पंचांग कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील, माजी सरपंच मधुकर मणेरे, दादासो पाटील, उदय गिते यांच्या हस्ते बेस्टसेलर पुस्तके भेट देण्यात आली. सामाजिक कार्याबद्दल उदय गीते यांचा सत्कार उद्योगपती जावेद फकीर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अजित खुडे, शकिल मुल्ला,मुन्ना लाहोरी,जावेद फकीर, विकास फडतारे,प्रसाद चव्हाण,जावेद मुजावर, रघुनाथ हाळवणकर,राहुल महालिंगपूरे,बाळू कामत,हुसेन मुजावर, कुणाल भोसले, रियाज चिकोडे,युवराज कांबळे, राजू मुल्ला, मुज्जमिल मुजावर, शिवाजी चव्हाण, अकबर सनदी आदी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.