कमिन्स इंडिया कंपनी च्या पुल कॅम्पस मध्ये शरदच्या 183 विद्यार्थ्यांची निवड
सलग नवव्यावर्षी विद्यार्थ्यांची निवड
यड्राव:प्रतिनिधी
दि. 25एप्रिल: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजीमध्ये पुणे येथील कमिन्स इंडिया कंपनीचा पूल कॅम्पस झाला. यामध्ये 183 विद्यार्थ्यांची निवड झाली. या कॅम्पस इंटरव्ह्युमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील सर्व अभियांत्रिकी पदविकेचे (डिप्लोमा) विद्यार्थीं सहभागी झाले होते. यामधील एकूण 183 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या इंटरह्युमध्ये शरद इन्स्टिट्युमधील सर्वाधिक 26 विद्यार्थ्यांची निवड झाली असून गेली नऊ वर्षे कंपनीचा कॅम्पस इंटरव्ह्यु या महाविद्यालयात होत आहे.
सध्या शरद इन्स्टिट्युटचे 50 विद्यार्थीं कंपनीत कार्यरत आहेत. महाविद्यालयाने आपल्यासह इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नोकरी देवून शरदमधील ‘प्रत्येक विद्यार्थ्यांला नोकरी’ची परंपरा कायम ठेवली आहे.
सदर इंटरव्ह्यु शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, यड्राव (ता. शिरोळ) या महाविद्यालयात झाले असून यामध्ये पाच जिल्ह्यातील मेकॅनिकल शाखेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये शरदमधील मेकॅनिकल शाखेचे उत्कर्ष पाटील, विकास सिंग, पंकज कुशावह, निर्भया कुशावह, रोहित भुसरे, अभिषेक चौगुले, अक्षय इंगळे, अनिकेत शिरोटे, वृषभ पाटील तर इलेक्ट्रीकल विभगातील वाहिद लडखान, अमन शेख, स्नेहल मुऴे, श्रावणी कांबळे, निशांत पाटील, ऐश्वर्या कोटे, सानिका थोरावत, राज चव्हाण, तुषार कांबळे, सानिका मोहिते, मानसी पाटील, सानिका पाटील, ओंकार पाटील, सिध्दांत पाटील, प्रथमेश पाटील, ओम म्हस्कर, श्रेयस या विद्यार्थ्यांची निवड झाली. कंपनीच्यावतीने एचआर व टेक्ऩिकल पॅनेलने विद्यार्थ्यांची अॅप्टीट्युड टेस्ट, टेक्ऩिकल इंटरव्ह्यु, एचआर इंटरव्ह्यु इत्यादी सोपस्कार पार पाडले.
शरद इन्स्टिट्युटमध्ये विद्यार्थ्यांसाठी सतत टेक्ऩिकल सेशन, व्हॅल्यू अॅडेड प्रोग्रॅम, कंपनी स्पेसीफिक ट्रेनिंग, अद्यावत तंत्रज्ञानाबाबत औद्योगिक क्षेत्रातील तज्ञांमार्फत मार्गदर्शन यासह विविध उपक्रम राबविले जातात, अशी माहीती ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाने दिली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन व राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर आणि एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. सदर निवडीसाठी प्राचार्य बी. एस. ताशीलदार, ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे प्रा. अभिजित केकरे, प्रा. नेहा सोनी यांच्यासह सर्व विभाग प्रमुख यांचे सहकार्य लाभले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.