साडवली वॉर्ड क्रमांक १ मधील विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा उत्साहात

 

देवरुख : सचिन पाटोळे

दि 28 एप्रिल: देवरुख नजीकच्या साडवली ग्रामपंचायत क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक एक मधील विकास कामांचा भूमीपूजन आणि उद्घाटन समारंभ गावचे सरपंच राजु शेठ जाधव यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला.

या ग्रामपंचायत क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक १ चे कार्यतत्पर; लोकप्रिय असणाऱ्या तसेच वॉर्डच्या विकासासाठी सतत पाठपुरावा करणाऱ्या अभिजीत सप्रे,विनोद वाडकर आणि श्रीमती मनिषा पाटोळे या ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रयत्नातून पुर्ण झालेल्या बने गल्लीतील डांबरीकरण झालेल्या रस्त्याचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. अनेक वर्षापासून प्रलंबित असणारे हे डांबरीकरणाचे काम सप्रे , वाडकर आणि पाटोळे या तीन सदस्यांनी सतत पाठपुरावा करुन पुर्ण करुन घेतले. तसेच सप्तलिंगी नगर येथील पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन करण्यात आले. या योजनेमुळे परिसरातील पाण्याचा प्रश्न कायम स्वरुपी सुटणार असुन या दोन्ही कामांबद्दल वॉर्ड क्रमांक १ मधील रहिवाश्यांनी ग्रामपंचायत सदस्यांचे कौतुक केले.

या उद्घाटन व भूमीपूजन कार्यक्रमाला उपसरपंच सौ सोनाली नलावडे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य; कर्मचारी वर्ग आणि वॉर्ड क्रमांक १ मधील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.