हातकणंगले तालुका गुरव समाज महिला अध्यक्षपदी रजनी गुरव यांची निवड

कबनूर– चंदुलाल फकीर

दि. ३० एप्रिल :तालुका गुरव समाज कार्यकारिणी समितीच्या बैठकीत हातकणंगले तालुका गुरव समाज महिला तालुका अध्यक्षपदी कबनूर येथिल श्रीमती रजनी रमेश गुरव यांची निवड करण्यात आली.निवडीची घोषणा तालुका अध्यक्ष अनिल गुरव (कावडे) दादासो गुरव (कोरोची) यांनी केली. निवडीनंतर तालुका अध्यक्ष अनिल गुरव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. श्रीमती रजनी गुरुव या कबनूर ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य आहेत. यापूर्वी त्याने ग्रामपंचायत सदस्य म्हणून पाच वर्षे काम केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.