श्रीगंगामाई गर्ल्स हायस्कूल ज्युनिअर कॉलेज मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा

इचलकरंजी : विजय मकोटे

दि. २ मे श्रीगंगामाई गर्ल्स हायस्कूल ज्युनिअर कॉलेज मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुप्रिया गोंदकर यांनी केले.प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून कामगार नेते कॉम्रेड सदा मलाबादे उपस्थित होते.

आपल्या प्रास्ताविकात श्रीमती सुप्रिया गोंदकर म्हणाल्या,देशाच्या स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचनेनुसार मुंबई राज्याची निर्मिती झाली मराठी भाषिकांच्या साठी मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी संघर्ष करावा लागला.या संघर्षात अनेकांना बलिदान द्यावे लागले. या संघर्षाला यश आले व 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. याच दिवशी जागतिक कामगार दिन साजरा केला जातो. यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक वक्ते कामगार नेते कॉम्रेड सदा मलाबादे म्हणाले,1 मे 1886 रोजी अमेरिकेतील शिकागो शहरात कामगारांनी एकत्र येऊन आपल्या न्याय मागण्या साठीसंघर्ष केला.भांडवल शाही व्यवस्थेविरुद्ध हा कामगारांचा पहिला लढा होता.रक्तरंजित संघर्षात अनेक कामगारांचा मृत्यू झाला.शेवटी या संघर्षाला यश आले.कामगारांचे कामाचे आठ तास निश्चित करण्यात आले.अजूनही जगात कामगारांचे शोषण थांबले नाही.आज ही जगातभांडवलशाही व्यवस्थेचा समाजावर मोठा प्रभाव आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी शेतमजूर कामगार यांचे शोषण होत आहे.त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी ,शेतमजूर,कामगार यांचे राज्य स्थापन करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.इचलकरंजीच्या यंत्रमाग कामगारांचे गुलामासारखे शोषण होत आहे.त्यांना कोणत्याही सुविधा सवलती नाहीत,पेन्शन नाही,ग्रॅच्युईटी नाही.त्यासाठी भांडवली समाज व्यवस्था बदलण्याची गरज आहे.असे प्रतिपादन कॉम्रेड सदा मलाबादेयांनी केले.यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुप्रिया गोंदकर,उपप्राचार्य आर एस पाटील,उपमुख्याध्यापिका सौ एस एस भस्मे,पर्यवेक्षक व्ही एन कांबळे,विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी आदिती शिंदे,कुमारी अलहिदा शेख उपस्थित होते स्वागतगीत सौ रानडे यांनी गायले.सूत्रसंचलन सौ एस एम कवळेकर यांनी केले.यावेळी शिक्षक विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.