ना.बा. शिक्षण संस्थेच्या विकास व विस्तारात स्व. मदनलाल बोहरा शेठजी यांचे योगदान महत्त्वाचे

आमदार -प्रा.जयंत आसगावकर

इचलकरंजी : विजय मकोटे
 दि. ४ मे .ना. बा. शिक्षण संस्थेच्या विकासात व विस्तारात स्वर्गीय मदनलाल बोहरा शेठजी यांचे योगदान महत्वाचे आहे.आपला उद्योग, व्यापार, व्यवसाय सांभाळून त्यांनी इचलकरंजीमध्ये शिक्षण क्षेत्रात भरीव काम केले आहे. इचलकरंजीमध्ये मोठ्या संख्येने असलेल्या कापड उद्योगातील सर्वसामान्य कामगारांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले .श्रीमानशेठ मदनलाल बोहरा यांचा वारसा विचार व काम पुढे नेण्यासाठी त्यांचे वारस संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवासजी बोहरा व चेअरमन हरिष बोहरा काम कारीत आहेत. ना. बा. शिक्षण संस्थेच्या विस्तारात बोहरा कुटूंबियांचे योगदान महत्वाचे आहे. असे प्रतिपादन पुणे शिक्षक मतदारसंघाचे लोकप्रिय शिक्षक आमदार प्रा. जयंतरावजी आसगावकर यांनी केलेे.

गंगामाई गर्ल्स हायस्कूल ज्यूनि. कॉलेजमध्ये स्वर्गीय श्रीमान शेठ मदनलालजी बोहरा व स्वर्गीय सौ.गीताबाई बोहरा यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम साजरा करण्यात आला.स्व.मदनलालजी बोहरा शेठजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम राबविले गेले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पुणे शिक्षक मतदारसंघाचे लोकप्रिय शिक्षक आमदार प्रा. जयंतरावजी आसगावकर उपस्थित होते.याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक करताना प्रशालेच्या मुख्याधापिका श्रीमती सुप्रिया गोंदकर म्हणाल्या, श्रीमान शेठ मदनलालजी बोहरा हे, ना. बा. शिक्षण संस्था परिवाराचे आधार वड होते. त्यांच्या प्रयत्नाने संस्थेचा विस्तार झाला.जिद्द चिकाटी, प्रयत्न या ‘त्री’सूत्रीने शेठजीनि काम केले. दिलेला शब्द पाळण्यासाठी शेठजी वचन बद्ध असत. तसेच शेठजींवर स्वरचित काव्यवाचनही केले.
यावेळी संस्थेचे ऑनररी सेक्रटरी बाबासाहेब वडिंगे म्हणाले, श्रीमान शेठजी मदनलाल बोहरा यांना नेहमी नावीन्याचा ध्यास होता. कितीही मोठ्या संकटातून ते योग्य व यशस्वी मार्ग शोधित असत ते कर्तृत्व संपन्न होते.यावेळी शिक्षकांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगते व्यक्त केली .
उपपप्राचार्य आर. एस. पाटील म्हणाले,कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व यांचा त्रीवेणी संगम असलेले बोहरा शेठजी इचलकरंजी नगरीचे भूषण होते. संकल्प केलेल्या सर्व योजना यशस्वी करण्यासाठी शेटजींनी प्रयत्न केले. व्यापार व्यवसायातून मिळालेले धन समाजासाठी परत करण्यासाठी शेवटच्या क्षणाप्रर्यत प्रयत्न केले. यावेळी उपमुख्याधापिका सौ. एस. एस. भस्मे, सौ. एस. जे. कुलकर्णी, क्रीडा शिक्षक श्री शेखर शहा सर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी प्रशालेच्या 53 व्या सुकन्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. हा अंक छापील हस्तलिखित व ई- क्यू .आर. कोड .प्रणालीद्वरे प्रकाशित करण्यात आला. सदरच्या ई- सुकन्या अंकामध्ये तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्यात आलेला आहे . हा अंक जगभरातील कानाकोपऱ्यामधील लोक वाचन करू शकतील. तसेच काही व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत. असा अंक शाळेच्या इतिहासात प्रथमच प्रकाशित करण्यात आला आहे असे
संपादिका सौ. व्ही. डी. रावळ यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रेसिडेंट श्रीनिवासजी बोहरा होते.त्यांनी शेठजींच्या आठवणींना उजाळा देताना गहिवरुन आले.
यावेळी व्हा. चेअरमन श्री उदय लोखंडे,ट्रेजरर श्री राजगोपाल डाळ्या, ऑनररी सेक्रेटरी श्री बाबासाहेब वडिंगे ,स्कूल कमेटी चेअरमन, श्री मारुतराव निमनकर, विश्वस्त श्री लक्ष्मीकांत पटेल, विश्वस्त श्री महेश बांदवलकर, श्री रामकिशोर तिवारी. , उपप्राचार्य आर. एस. पाटील, उपमुख्याधापिका सौ. एस. एस. भस्मे, पर्यवेक्षक श्री व्ही. एन. कांबळे क्रीडाशिक्षक श्री. सी.एम. शहा सर उपस्थित होते.
यावेळी प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मोफत उन्हाळी शिबारात घेण्यात आलेल्या योगासन, लाठीकाठी, तायक्वांदो ,कराटे , मातकाम, नृत्य ,क्राफ्ट ,अभिनय इ.विविध उपक्रमांचे यशस्वी विद्यार्थिनींना बक्षिसे देण्यात आली. क्रीडाशिक्षक श्री.सी.एम.शहा सर यांनी पुढील वर्षाच्या शिबिरासाठी रोख रकमेचा निधी जाहीर केला.

स्वागत गीत सौ. रानडे यांनी गायले सूत्रसंचलन सौ एस. एन. कवळेकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी शिक्षक, विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.