दि इचलकरंजी मर्चंट्स बँकेच्या एटीएम सुविधेचा शुभारंभ
इचलकरंजी : संजय आंबे
दि. ५ मे :दि इचलकरंजी मर्चंटस् को-ऑप.बँकेच्या जनता चौक, इचलकरंजी येथील प्रधान कार्यालय वास्तूत स्वमालकीचे नुतन एटीएम मशीनचा शुभारंभ सहकारमहर्षी माजी खासदार श्री.कल्लाप्पाआण्णा आवाडे (दादा) यांच्या हस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी बँकेचे चेअरमन राजगोंडा पाटील, व्हा.चेअरमन बाळासाहेब बरगाले, संस्थापक चेअरमन इरगोंडा पाटील, ज्येष्ठ संचालक विलास गाताडे, बँकेचे जनरल मॅनेजर दिपक काटकर, बँकेचे सल्लागार पी.टी.कुंभार, कायदे सल्लागार अॅड.स्वानंद कुलकर्णी, ॲड.दत्ताजीराव कंदले, माजी संचालक कमलाकर पालनकर, कुंभोजचे उप-सरपंच अनिकेत चौगुले, इचल. जनता बँक व्हा.चेअरमन सी ए चंद्रकांत चौगुले, ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, व्यापारी पत संस्थेचे चेअरमन सूर्यकांत साखरे, व्हा.चेअरमन शशिकांत शेटके, यांच्यासह बँकेचे संचालक, सभासद, कर्मचारी व ग्राहक वर्ग उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.