धरणगुत्ती येथे आरोग्य शिबिर व विविध योजनाचे वाटप
जयसिंगपूर : विजय धंगेकर
दि. १३ मे :कोणत्याही गावचा विकास करायचा झाला तरी, तो प्रामाणिपणे करावा लागतो. माजी सरपंच शेखर पाटील यांनी गाव कसे आदर्श निर्माण करावे, हे त्यांनी करून दाखविले आहे. गावात विविध योजना राबवून जिल्हा एक आदर्श ग्रामपंचायत निर्माण केल्यामुळेच धरणगुत्तीला शासनाचे 35 पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे यापुढेही शेखर पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद मतदार संघातही मॉडेल तयार करून घ्या, असे प्रतिपादन माजी आमदार उल्हास पाटील यांनी केले.
धरणगुत्ती (ता.शिरोळ) येथे माजी सरपंच शेखर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आप्पासाहेब ऊर्फ सा.रे.पाटील सोशल फौंडेशन धरणगुत्ती ग्रा.पं. यांच्यावतीने उष:काल अभिनव आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर यासह विविध योजनांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पाटील बोलत होते.
प्रथम स्व.सा.रे.पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात 260 रूग्नांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आले. तसेच 56 रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्याचबरोबर 105 जणांचे आयुष्यमान कार्ड काढण्यात आले. ग्रामस्थांना कापडी पिशवीचे वाटप, अब्दुललाट येथे धान्य वाटप, स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. त्यांनतर ग्रा.पं.कडून गावातील 8 बचत गटांना चटणी कांडप मशिन, कन्यारत्न अनुदानाचे वाटप करण्यात आले.
यावेळी दत्त कारखान्याचे संचालक शेखर पाटील यांनी गावाच्या विकासाबरोबरच जनेतीची नाळ सोडणार नाही शिवाय जिल्हा परिषद मतदारसंघात विकास कामाचा डोंगर उभा करू असे आश्वासन दिले. त्यानंतर शिरोळचे उपनगराध्यक्ष तातोबा पाटील, नगरसेवक योगेश पुजारी, जि.प.सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, नांदणी बँकेचे चेअरमन आप्पासाहेब लठ्ठे, डॉ.विकास गोसावी, सरपंच विजया कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी उपसरपंच जीवन रजपूत, ग्रा.पं.सदस्य मनोहर माळी, भालचंद्र लंगरे, अजित वराळे, अमर जगदाळे, सुरेश आरगे, राहूल मेस्त्री, बाळासो केरीपाळे, अनिल गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.