कबनूर सरपंचांनी दिला आत्मदहनाचा इशारा
कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊन घनकचरा प्रकल्प मार्गी लावावा- सौ शोभा पोवार
कबनूर – चंदुलाल फकीर
दि. १९ मे. :कबनूर गावातील गोळा होणारा कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊन घनकचरा प्रकल्प मार्गी लावावा अन्यथा ते २३ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरपंच उपसरपंच सदस्य यांना अमरण उपोषण आत्मदहन आदी मार्गांचा अवलंब करावा लागेल असा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. अशी माहिती सरपंच शोभा पोवार यांनी दिली.
कबनूर गावची लोकसंख्या पन्नास हजार पेक्षा अधिक आहे गावातील सहा प्रभागांमध्ये गोळा होणारा घनकचरा डम्पिंग करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने गावामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचून राहिले आहेत.त्यामुळे गावातील नागरिकांचा मोर्चा ग्रामपंचायतीवर येत आहे गावांमध्ये साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.जागा नसलेमुळे गावातील गोळा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतीला मुश्किल झाले आहे. कचरा प्रक्रिया करण्यासाठी व कचरा प्रकल्प उभा करण्यासाठी गावातील जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आपल्याकडे सतत आहोत गावातील गोळा झालेला कचरा टाकणेसाठी गावांमध्ये जागा उपलब्ध नाही .ग्रामपंचायतीस जागा मिळावी या मागणीचा प्रस्ताव गेली दोन वर्षे झाली प्रलंबित आहे आपल्या कार्यालयामार्फत सूचना देऊन जागा उपलब्ध करून द्यावी. गावातील घनकचरा बाबत प्रश्न मार्गी लावण्यासाठी ताबडतोब याचा सारासार विचार करून आपण घनकचरा प्रकल्प करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आपल्याकडे करीत आहोत हा प्रश्न निकालात काढावा घनकचरा प्रकल्प साठी जागा व प्रकल्प करण्यास परवानगी आपल्या स्तरावर मिळावी अन्यथा २३ मे पासून आपल्या कार्यालयासमोर माझ्यासह उपसरपंच, सदस्य अमरण उपोषण, आत्मदहन सारखे आंदोलन करणार आहोत असे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, तहसीलदार व गटविकास अधिकारी हातकणंगले यांनाही याबाबत माहितीसाठी निवेदनाची प्रत पाठविण्यात आली आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.