चिपळूण , रत्नागिरी मध्यवर्ती एस टी स्टँड अपूर्ण बांधकाम पूर्ण न केल्यास ठेकेदार आणि परिवाहन मंडळावर फौजदारी दाखल करणार – अशोकराव जाधव

काँग्रेस, शेतकरी - कष्टकरी संघटनेची घोषणा .

 

चिपळूण: –

बांधा , वापरा , हस्तांतरीत करा या तत्वावर महामंडळाने एस टी स्टँड बाधण्यास ठेकेदारांना दिली पण चिपळूण , रत्नागिरी एस टी स्टँड बांधायला घेणाऱ्या ठेकेदारांनी आणि परिवाहन मंडळाच्या बेजबाबदार प्रशासनाने प्रवाशांना अक्षरशः वेठीला धरले आहे. तसेच निवडून आलेल्या सर्व स्थरातील स्थानिक लोकप्रतिनीधी सकट त्याची कोणाला ही चिंता नाही या बाबत सर्वच स्थरावर अनास्था पाहता आता काँग्रेस आणि शेतकरी -कष्टकरी संघटनेच्या वतीने फौजदारी केस दाखल करणार असलेची घोषणा काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि अध्यक्ष शेतकरी -कष्टकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी केली .
या बाबत ते पुढे म्हणाले की प्रवासी जनतेने या पुढे अन्याय सहन करू नये , प्रवास सर्वच जाती , धर्म , समाज , सर्वच राजकीय प्रक्षाच्या व संघटनेच्या लोकांना करावा लागतो त्या मुळे सर्वानी मनभेद ,मतभेद विसरून या लढ्यात एकत्र आले पाहिजे , फौजदारी खटला दाखल केल्या नंतर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस पक्ष आणि शेतकरी कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वा खाली सर्वांना बरोबर घेवून एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार आहे अशी माहिती अशोकराव जाधव यांनी दिली . यावेळी महादेव चव्हाण अध्यक्ष चिपळूण संगमेश्वर विधान सभा क्षेत्र , अल्पेश मोरे अध्यश जिल्हा युवक काँग्रेस , यश पिसे , विश्वनाथ किल्लेदार , ऊत्तम गायकवाड , दिपक दळवी, विचारे , अनंत धामणे , दिपक निवाते, अॅड जिवन रेळेकर , पप्या शेठ साळवी , बशीर बेबल , सुरेश राऊत , बेलवलकर , कैसर देसाई,मैनुद्दीन सय्यद इत्यादी लोक ऊपस्थीत होते .

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.