संगमेश्वर :नियाज खान
दि: ५ जून :रत्नागिरी जिल्हा काँग्रेस आयचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री अनिरुद्ध कांबळे यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा संगमेश्वर धामणीनजीकच्या हॉटेल सनराईज च्या सभागृहामध्ये जल्लोष व उत्साहवर्दक वातावरणात संपन्न झाला.
सामाजिक कार्यामध्ये आपला आगळा वेगळा ठसा उमटवलेले आणि शिव, शाहू, फुले, आंबेडकर याच्या विचाराचा वारसा जोपासून त्याचें कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करणारे अनेक वर्षे सामाजिक धार्मिक, कला, क्रीडा, सहकार व राजकीय क्षेत्रात अतिशय तळमळीने कार्य करणारे संगमेश्वर लांजा तालुक्याचे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून अनिरुद्ध कांबळे यांजकडे पहिले जाते. तसेच गेली अनेक वर्षे निःस्वार्थीपणे जातीधर्माच्या पलीकडे जाऊन अतिशय उत्तम प्रकारे काम करणे त्याच्या मुळे सर्व धर्मातील व्यक्ती माणसे ही सतत त्याच्या सानिध्यात आहेत याचाच प्रत्यय १ जून २०२२ रोजी अनिरुद्ध कांबळे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळयांच्या दिनी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच प्रत्येक जातीधर्मातील त्याच्यावर प्रेम करणारी मंडळी आवर्जून उपस्थित होती.
या मध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले, चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघांचे विध्यमान आमदार श्री शेखरजी निकम, मा. मंत्री श्री रवींद्रजी माने, जिल्हाध्यक्ष काँग्रेस श्री अविनाश लाड, चिपळूण तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री प्रशांत यादव काँग्रेस पक्षाचे जनरल सेक्रेटरी श्री अशोक कातकर, श्री राजन देसाई, ई. राजकीय क्षेत्रातील नेतेमंडळींनी तसेच रत्नागिरी जिल्यातील प्रतिषयत उद्योजक श्री किरण शेठ उर्फ भैया सामंत, शैक्षणिक क्षेत्रातील कस्ट्राईल माध्यमिक शिक्षक संघांचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वाघोदे, भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री लक्ष्मण पवार ई भ्रमणध्वनी वरून शुभेच्छा दिल्या.

तसेच अभिष्टचिंतन सोहळा स्थळी प्रमुख उपस्तिथी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री उदय झावरे यांची प्रमुख उपस्तिथी लाभली त्याच्या समवेत त्याचें कर्मचारी श्री मुरुडकर, माहेर संस्थेचे अधीक्षक श्री सुनील कांबळे, रिपब्लिकन पक्षांचे कोकण प्रदेशाध्यक्ष रोहितजी तांबे, श्री विजय कदम, श्री राजन मोहिते, आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते श्री मनोज जाधव, पत्रकार वहाब दळवी, पत्रकार श्रीराम शिंदे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.