ग्रृप ग्रामपंचायत राजिवली कार्यक्षेञातील बी एस एन एल मोबाईल टाॅवरचा लोकर्पण सोहळा
संगमेश्वर : सचीन पाटोळे
दि. ७जून : ग्रृप ग्रामपंचायत राजिवली कार्यक्षेञातील बी एस एन एल मोबाईल टाॅवरचा लोकर्पण सोहळा बहुसंख्य नागरीकांच्या उपस्थित मोठ्या उत्साहामधे पार पडला.
पंचकृषीतील ग्रामस्थांचे कित्येक स्वप्न होते की भैरवगडाच्या कानाकोपर्यात पंचकृषीमधे नेटवर्क यावे,हे स्वप्न 2017 च्या ग्रामपंचायत निवडणुकीमधे शिवशाही पॅनलने जनतेला मतदानपुर्वीच्या वचनाम्यामध्ये दिलेल्या शेवटचे वचन बी एस एन एल मोबाईल टाॅवर चालु करून वचननामा पुर्ण करून जनतेला दिलेला शब्द पाळला.

हे पॅनल उभे केले ते सामाजिक कार्यकर्ते संतोष येडगे व सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटोळे यांनी .हे पॅनल निवडुन आल्यानंतर मंञालय स्थरावर विकास कामांचा पाठपुरावा केला ५ वर्षामध्ये 8 ते 9 कोटीचा निधी आणला व पंचकृषीतील जनतेला दिलेल वचन पुर्ण केले.
टाॅवरसाठी विशेष आभार म्हणजे मा खा. सुरेशजी प्रभु माजी रेल्वे मंञी यांच्या सहकार्यांने पंचकृषीतील जनतेचे स्वप्न पुर्ण झाले, तसेच या कामाचा सातत्याने पाठपुरावा करून मंजुर करून घेतला ते उपसरपंच संतोष येडगे यांचे या कामामध्ये मोठे योगदान आहेे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन उप महाप्रबंधक-संचालन बी एस एन एल रत्नागिरी,यांच्या हस्ते टाॅवरचे उदघाटन सोहळा पार पडला.
कार्यक्रमाच्या वेळी मा.उमेद शिरसाठ- (उपमंडळ अभियंता मोबाईल बी एस एन एल ),ग्रृप ग्रामपंचायत राजिवली सरपंच सौ शमिका पाटोळे,उपसरपंच संतोष येडगे,ग्रामसेवक सावंत,ग्रामसेवक जाधव,तंटा मुक्त समिती अध्यक्ष अरूण कदम,मा.जि.नियोजन समिती सदस्य तुकाराम येडगे,सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटोळे,जि प शाळा राजिवली मुख्यध्यापक सिंदे सर ,पोलीस पाटील शांताराम निकम,आरोग्य सेविका कुमोदीनी चव्हान,ग्रामपंचायत सदस्य सचिन कदम,प्रशांत शिर्के,प्रगती शिर्के व इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.