दि.एज्युकेशन सोसायटी कडवई कॅम्पसमध्ये कॅन्टीन सुरु होणार
कडवई:
महाराष्ट् ऊर्दू हायस्कूल व ज्युनियर काॅलेज आॅफ सायन्स कडवई याठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांना आता लवकरच कॅन्टीनची सुविधा उपलब्ध होणार तसेच शाळेय वस्तू वही, पुस्तके, पेन्सील,पेन इत्यादी याठिकाणी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतील.महाराष्ट्र ऊर्दू हायस्कूल कडवई हे नाव प्रख्यात आहे. ही शाळा रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कडवई गावात,या शाळेचे नाव अखंड भारतातत प्रसिध्द आहे.या शाळेत भारतातील विविध राज्यांतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेची गुणवत्ता चांगली व चांगले शिक्षक वर्ग,चांगला निकाल,त्याच प्रकारे शाळेतील व्यवस्थापकांचे शाळेवर असणारे चांगले कार्य यामुळेच प्रमुख्याने ही शाळा झपाटय़ाने प्रगती करीत आहे.
महाराष्ट्र ऊर्दू हायस्कूल कडवई, कालसेकर ज्युनियर काॅलेज आॅफ सायन्स कडवई, दि कडवई इंग्लिश स्कूल यातील विद्यार्थींना कॅन्टीन तसेच शाळेय वस्तू मिळणारे दुकान दि. एज्युकेशन सोसायटी कडवईच्या कॅम्पस मध्ये उपलब्ध होईल.यासाठी ज्यांना हे टेंडर मिळण्यासाठी अर्ज करायचे असेल त्यांनी मुख्याध्यापकांकडे शाळेय कामकाजाच्या वेळेत जाऊन फार्म घ्यावा. जास्त निविदा रक्कम भरणाऱ्यास टेंडर दिले जाईल.याची तपशीलवार माहिती फार्म मध्ये उपलब्ध आहे.तरी इच्छुक उमेदवारांनी १० ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करावे असे संस्थेकडून कळविण्यात येते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.