डीकेटीईमध्ये स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबीर संपन्न
इचलकरंजी ता. ०१ ऑगस्टः डीकेटीई मध्ये स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. लोकमान्य टिळक पुण्यतिथी व स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष याचे औचित्य साधत १ ऑगस्ट रोजी डीकेटीईच्या एन.एस.एस. विभागाच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. अवघ्या साडेतीन तासात सुमारे २०० हून अधिक बॅग्ज रक्त संकलन करण्यात आले. वर्षभर या रक्तदानाचा लाभ प्रत्येक डीकेटीयन ला यामुळे मिळतो. डीकेटीई नेहमीच समाज हीतासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवित असते. वर्षातून दोनवेळा रक्तदान शिबीराचे आयोजन डीकेटीई मध्ये करण्यात येते व दोन्ही वेळेस विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभतो.
स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष, आनंदात करु देशासाठी रक्तदान या विषयांतर्गत आयोजित रक्तदान शिबीरास विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद होता. डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाशआण्णा आवाडे व ट्रस्टी सर्जेराव पाटील यांनी या कॅम्पला भेट दिली व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.सदर शिबीराचा शुभारंभ इन्स्टिटयूटचे संचालक प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करुन झाले. उपस्थितांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्प वाहून वंदन केले. आधार ब्लड बॅक, इचलकरंजी चे अध्यक्ष सतिश मेेटे, मेडिकल ऑफीसर डॉ. विजय कोपर्डे, आणि लायन्स ब्लड बँक, इचलकरंजी चे मेडिकल ऑफीसर विठठल कुलकर्णी हे सहका-यांसवे रक्त संकलनासाठी आलेले होते.
प्रा.ए.व्ही. शहा, प्रा.ए.आर. बलवान, प्रा.आर.एस.पाटील, डॉ.आर.डी. नाईकनवरे, प्रा.एस.जी.कानिटकर, प्रा. के. के. पवार, तसेच विद्यार्थी प्रतिनिधी सुमोद दानोळे, सौरभ खांडेकर, नविन शेटके,विजय कोळी, आकांक्षा घाटगे, मयुरी बारुडेे, नेहा जोशी यांच्यासवे सर्व विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रमाचे संयोजन केले.
Comments are closed.