इचलकरंजी भाजपा तर्फे “हर घर तिरंगा” अभियान सुरु.
इचलकरंजी : हबीब शेखदर्जी
देशाच्या ७५ व्या अमृतमोहोस्त्व निमित्त देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा हे अभियान चालू केले आहे.देशवासीयांनी आपल्या प्रत्येक घरावर १३ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान तिरंगा लावण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.नागरिकांच्या मध्ये देश प्रेम वाढावा, देशाबद्दल राष्ट्रभक्ती जागृत होऊन पूर्ण भारत देश हा एकसंघ आहे हे जगाला दाखवण्याचा प्रयत्न देशाचे पंतप्रधान यांनी केले आहे.
त्याचाच एक भाग म्हणून इचलकरंजी विधानसभा मतदारसंघमध्ये प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावावा यासाठी भारतीय जनता पार्टी इचलकरंजीच्या वतीने हर घर तिरंगा हे अभियान सुरु केले आहे. या अभियानाची सुरुवात भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर व शहराध्यक्ष अॅड. अनिल डाळ्या,मा.उपनगराध्यक्ष तानाजी पवार,ज्येष्ठ नेते मिश्रीलाल जाजू,नगरसेवक किसन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.व इचलकरंजी मतदारसंघातील नागरिकांनी मोदींचे स्वप्न हर घर तिरंगा हे सत्यात उतरवायचे काम इचलकरंजी वासियांनी करावे असे आवाहन मा.आम.हाळवकर यांनी केले. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख,पदाधिकारी व आघाडी अध्यक्ष यांनी आपल्या घराबोरबर बाजूच्या दाहा घरांवर तिरंगा लावण्यास प्रोत्साहित करण्याचे काम करण्याचे आवाहन भाजपा शहराध्यक्ष अॅड. अनिल डाळ्या यांनी केले. तसेच भाजपा आपल्या कार्यकर्त्याना तिरंगा ध्वज देणार असून संपूर्ण इचलकरंजी नगरी तिरंगामय करण्याचे आवाहन भाजपने आज केले. याप्रसंगी सरचिटणीस अरुण कुंभार, अरविंद शर्मा, कबनूर उपसरपंच सुधीर पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण पाटील, नगरसेवक मनोज साळुंखे, जयकुमार काडाप्पा, शुभम बरगे, प्रदीप मळगे, उत्तमसिंग चव्हाण, अरविंद चौगुले तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.