संगमेश्वर : नियाज खान
दि. ११ ऑगस्ट :संगमेश्वर मापारी मोहल्ला आणि कसबा येथील मुस्लिम बांधवानी मोहरम हा सण पारंपारिक पद्धतीने साजरा केला . गेली दोन वर्ष कोरोनामुळे मोहरम ला ताबूत ची मिरवणूक निघाली नव्हती यावर्षी मात्र कोरोनाचे निर्बध हटवल्याने संगमेश्वर मापारी मोहल्ला आणि कसबा येथील मुस्लिम बांधवानी ताबुतची मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात काढली .
पाऊसाच्या सरी अंगावर झेलत मापारी मोहल्ला येथील मुस्लिम बांधवांनी संगमेश्वर बाजारपेठ ते एस .टि .स्टॅन्ड तसेच कसबा येथील मुस्लिम बांधवांनी कसबा मोहल्ल्यातून ज़िल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा पर्यंत रस्त्याने ढोल ताशांच्या गजरात नाचत गात मोठ्या उत्साहाने ४ तास मिरवणूक काढण्यात आली .मिरवणुकी मध्ये लहान मुले , तरुण मंडळी , ज्येष्ठ नागरिक बशीर भाई खान , श्री झहीर मापारी , श्री गुलाम पारेख , श्री इल्यास मापारी , श्री मोहंमद शहा , नूरखान युसूफ खान , रऊफ खान , सादिक खान , यासीन मुजावर इत्यादि मंडळी सामील झाली होती . ही मिरवणूक पाहण्यासाठी संगमेश्वर बाजारपेठ आणि कसबा या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती .
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Mahalaxmi times is weekly Marathi news paper.mainly working in three Dist.kolhapur,sangli n ratnagiri.along with print media we have face book pages, Instagram,youtube channel,web
news portal . namely news17 .
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.